मुंबई- पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले आहे. ज्यामध्ये एकाच दिवशी 6 हजार 272 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून 40 लाख 9 हजार रुपयांची दंड वसूल केला आहे.
सर्वाधिक फुकटे प्रवासी-
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने शनिवारी एकदिवसीय तिकीट तपासणी अभियान राबविले. यात उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणीची मोहीम राबिविण्यात आली. या तपासणी दरम्यान ६ लाख २७२ फुकटे प्रवासी आढळून आले आहे. त्यांच्याविरोधात रेल्वेने कारवाई करत ४० कोटी ९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या मोहिमेत तिकिट चेकिंग स्टाफ, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी होते. यांच्याद्वारे तिकीट तपासणी होत होती.याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये विना तिकीट प्रवाशांना पकडून 28 लाख 25 हजार रुपयांची दंड वसुली केली होती. एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2021 या दरम्यान तिकीट चेकिंग स्टाफने एकूण 2 लाख 78 हजार विनातिकीट प्रकरणे नोंद केली. यातून 13 कोटी रुपयांची दंड वसूली केली आहे, मात्र आतापर्यंतची एकदिवसीय ही सर्वाधिक मोठी कारवाई असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
रेल्वेकडून आवाहन-
राज्यसरकारने अनुमती दिलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रवाशांशिवाय इतर प्रवाशांनी स्थानक परिसर अथवा लोकलमधून प्रवास करू नये. यासह प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करावा. प्रवासात कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.
कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई-
17 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोविड-19 योग्य वर्तनाचे पालन न केल्याच्या एकूण 25 हजार 610 प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 34 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. याशिवाय मास्क न घालता रेल्वे प्रवास करणाऱ्या एकूण 20 हजार 570 प्रवाशांवर आणि प्रवासाची परवानगी नसतानाही प्रवास करणाऱ्या 5 हजार 40 प्रवाशांवर रेल्वेने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 25 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
एका दिवसात सहा हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना रेल्वेने पकडले ! - विनातिकीट प्रवाशी
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले आहे. ज्यामध्ये एकाच दिवशी 6 हजार 272 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून 40 लाख 9 हजार रुपयांची दंड वसूल केला आहे.