मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी काही काळा ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.
यावेळी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर दुआ ( Shah Rukh Khan Dua ) मागितली आणि फुंकर मारली. यावर सोशल मीडियावर शाहरुखला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावर संजय राऊत, उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar about shah rukh khan dua ) यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले
ज्या पद्धतीने शाहरुख खान यांनी त्यांच्या पद्धतीने दुआ मागितली. काही गटाचे लोक आयटी सेलचे लोक हे ट्रोल करत आहेत. त्यांनी देशाची वाट लावलेली आहे. धर्म, जातीच्या नावावर तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकाराला ट्रोल करताय हे निंदनीय आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
'आज का दिन तो छोड़ देतें' - उर्मिला मातोंडकर
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं। इस सभ्यता, संस्कृति को #भारत कहते हैं। प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता। भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान” (आज का दिन तो छोड़ देतें) असे ट्वीट करून उर्मिला मातोंडकर यांनी शाहरुख खान यांना ट्रोल करणाऱ्या गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
इस्लाममध्ये फुंकण्याची परंपरा काय आहे?
इस्लामिक परंपरेनुसार, जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा दोन्ही हात छातीपर्यंत उभे करावे लागतात आणि अल्लाहला प्रार्थना केली जाते. हे अगदी तसेच आहे, ज्याप्रमाणे एखाद्यासमोर आपण मदतीचा हात पसरवतो, त्याच पद्धतीने दोन्ही हात एकत्र पसरवून अल्लाहसमोर आपली विनंती केली जाते. कोणाच्या तरी आरोग्यासाठी दुआ, कोणाच्या नोकरीसाठी दुआ, किंवा कोणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी दुआ... दुआ काहीही असू शकते. दोन्ही हात पसरून प्रार्थना केल्याचे चित्रही चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.
नेमकं काय झाले?
शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर जे केले ते म्हणजे लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याने प्रार्थना केली असावी, लतादीदींसाठी ज्याप्रकारे लाखो चाहत्यांनी प्रार्थना केली त्याचप्रमाणे शाहरुखने दोन्ही हात पसरून प्रार्थना केली. प्रार्थना करताना त्याच्या अंगावर काळा मास्क होता. त्याने सुमारे 12 सेकंद प्रार्थना केली आणि नंतर तोंडातून मास्क काढून टाकला. मास्क काढून त्याने किंचित वाकून लतादीदींच्या पार्थिवावर फुंकर मारली.