ETV Bharat / city

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी इन कॅमेरा घ्या, आरोपी पुरोहित यांची न्यायालयात मागणी

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या खटल्याची इन - कॅमेरा कार्यवाही आणि मीडिया नियमावली घालून द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज आज मंगळवार (दि.11) रोजी विशेष एनआयए न्यायालयात दाखल केला.

Accused Sameer Kulkarni
आरोपी समीर कुलकर्णी
author img

By

Published : Jan 11, 2022, 4:54 PM IST

मुंबई - 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या खटल्याची इन - कॅमेरा कार्यवाही आणि मीडिया नियमावली घालून द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज आज मंगळवार (दि.11) रोजी विशेष एनआयए न्यायालयात दाखल केला. या प्रकरणातील सह आरोपी समीर कुलकर्णी याने या अर्जाला विरोध केला आहे. आता न्यायालय या अर्जाबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहिती देताना आरोपी समीर कुलकर्णी

हेही वाचा - Arthur Road Jail : आर्थर रोड जेलमधील 27 कैद्यांना कोरोनाची लागण

मालेगाव बॉम्बस्फोटातील क्रमांक 9 चे आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितच्या वकिलाने इन कॅमेरा कार्यवाही करण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला. माध्यमांनी या खटल्याचे वृत्तांकन करताना अटी आणि शर्तीेचे उल्लघंन केल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित यांनी केलेल्या मागणीला सहआरोपी समीर कुलकर्णी यांनी विरोध दर्शवला. यापूर्वी देखील अशाच प्रकारे प्रसाद पुरोहित यांनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला विशेष न्यायालयाने फेटाळून लावले होते. तरी देखील पुन्हा अर्ज करत या प्रकाराला आणखी कसा वेळ लागेल या करिता हा अर्ज करण्यात आला आहे, असे न्यायलयात म्हणण्यात आले. मात्र, यावर सह आरोपी समीर कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, मीडियाला काही अटी आणि शर्तींच्या आधारावर एनआयए न्यायालयाने परवानगी दिली असून त्यावर प्रतिबंध आणण्याची मागणी योग्य नसल्याचे समीर कुलकर्णी यांनी म्हटले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयासमोर साक्षीदरम्यान अनेक साक्षीदार यांनी आपली साक्ष बदलली आहे. तर, एका साक्षिदाराने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप देखील केले आहे. आतापर्यंत या खटल्यांमध्ये एकूण 16 साक्षिदारांनी आपली साक्ष बदलली आहे.

हेही वाचा - Shah Rukh Threate : शाहरुख खानचा मन्नत बंगला उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.