ETV Bharat / city

Mumbai bomb blast case : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक - ats arrest Mumbai bomb blast case accused

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Mumbai bomb blast case ) आरोपींना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे. बनावट पासपोर्टसह अहमदाबादवरून त्यांना अटक झाली.

Mumbai bomb blast case
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By

Published : May 17, 2022, 12:37 PM IST

Updated : May 17, 2022, 1:55 PM IST

मुंबई - मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Mumbai bomb blast case ) आरोपींना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे. बनावट पासपोर्टसह अहमदाबादवरून त्यांना अटक झाली. आरोपींमध्ये अबू बकर, युसूफ भटाका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांचा समावेश आहे.

  • Gujarat ATS arrests four accused in the 1993 Bombay serial blasts case.

    — ANI (@ANI) May 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - चीन, पाकिस्तानला भरणार धडकी.. भारतीय नौदलात दाखल होणार दोन शक्तिशाली लढाऊ जहाजे..

याबाबत माहिती देताना एटीएसचे डीआयजी दीपेन भद्र यांनी सांगितले की, दाऊदचे चार लोक बनावट पासपोर्टवर अहमदाबादमध्ये आले होते. चारही जणांकडून बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. बॉम्बस्फोटात कोणाची भूमिका होती का? याचाही तपास केला जाणार आहे. हे चौघे अर्जुन गँग म्हणून ओळखले जात असल्याचे एटीएसने सांगितले.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील वॉन्टेड गुन्हेगार आणि कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम अद्यापही फरार असून, त्याच्याविरुद्ध केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी दाऊद इब्राहिमचे जवळचे असल्याचे सांगितले जात असून, ते दाऊदच्या इशाऱ्यावर अनेक दिवसांपासून देशातील विविध शहरांमध्ये गुन्हेगारी कारवाया करत आहे.

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट- मुंबईत १२ मार्च १९९३ या दिवशी विविध १२ ठिकाणी स्फोट झाले. यात २५७ लोकांचा बळी गेला होता. तर, ७१३ लोक जखमी झाले होते. २००७ मध्ये टाडा न्यायालयाने १२ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यात याकूब मेमनचाही समावेश होता. त्याला २०१५ मध्ये फासावर लटकावण्यात आले. तर इतर २० दोषींना जन्मठेप झाली होती.

हेही वाचा - Deepali sayyad challenged to MNS : अयोध्येत सभा घेऊन दाखवा, शिवसेनेचा मनसेला चिमटा

Last Updated : May 17, 2022, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.