ETV Bharat / city

दहावीच्या परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करा -अभाविपची मागणी

अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या, की महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच महाराष्ट्राची कोविड परिस्थिती बघता, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आ

author img

By

Published : Apr 21, 2021, 7:51 PM IST

Updated : Apr 21, 2021, 8:03 PM IST

दहावीच्या परीक्षा
दहावीच्या परीक्षा

मुंबई- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे.

अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या, की महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच महाराष्ट्राची कोविड परिस्थिती बघता, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. परंतु त्याचे मूल्यमापन हे कशाच्या आधारावर होणार याबाबत राज्य सरकारने स्पष्ट केले नाही.

दहावीच्या परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करा

हेही वाचा-कोव्हॅक्सिन कोरोनाविरोधात १०० टक्के प्रभावी; कंपनीकडून तिसऱ्या टप्प्यांचे निकाल जाहीर

पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश हे कशाच्या आधारावर देणार?

दहावीच्या अभ्यासक्रमानंतर पुढील अभ्यासक्रमासाठी काही महाविद्यालयात मेरीट लिस्टचा आधारावर प्रवेश विद्यार्थांना दिला जातो. मात्र आता विद्यार्थाना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश हे कशाच्या आधारावर देणार याबाबतीतदेखील मोठा प्रमाणावर विद्यार्थी, पालक व शिक्षक संभ्रमात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम दूर करावे, अशी मागणी अभाविपच्या कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी केली आहे.

हेही वाचा-टाटांचे कौतुकास्पद पाऊल; ऑक्सिजन वाहतुकीकरता २४ क्रायोजेनिक कंटेनर करणार आयात

परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करा -
विविध पदविका, अकरावी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) च्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारने काय योजना केली आहे? या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कधीपर्यंत घोषित केले जाईल ? बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप याबाबत वेळापत्रक घोषित केले गेले नाही. १२ वी परीक्षेचे वेळापत्रक घोषणेबाबत स्पष्टता द्यावी, अशी अपेक्षा अभाविप कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. ते शुल्क कधीपर्यंत परत केले जाईल, याबाबत लवकरात राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी, अशी मागणी अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी केली.

Last Updated : Apr 21, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.