ETV Bharat / city

Shivsena controversy : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविणे म्हणजे... आपने दिली तिखट प्रतिक्रिया - Shiv Sena bow and arrow controversy

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे कोणाला मिळणार ? अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा वाद सर्वोच्च न्यायालयात ( Disputes in the Supreme Court ) होता. या वादावर आप महाराष्ट्राच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन ( AAP Maharashtra leader Preeti Sharma Menon ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Preeti Sharma Menon
प्रीती शर्मा मेनन
author img

By

Published : Oct 9, 2022, 12:45 PM IST

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे कोणाला मिळणार ? अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा वाद सर्वोच्च न्यायालयात (Disputes in the Supreme Court ) होता. घटनापिठाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग केले. त्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह व शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. त्यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे. या वादात आता आम आदमी पार्टीने देखील उडी घेतली आहे. या वादावर आप महाराष्ट्राच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन ( AAP Maharashtra leader Preeti Sharma Menon ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ही एक आणिबाणीच : निवडणूक आयोगाने जो शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिलाय तो अतिशय घातक आहे. भाजप धमकावून घाबरून तर कधी पैसे देऊन इतर पक्षातील नेत्यांना आमदार खासदारांना त्यांच्या पक्षात घेतेय काहींना विकत घेते हे आपण बघतच आहोत. पण जर निवडणूक आयोगाला हाताशी धरून जर एखाद्या संपूर्ण पक्षालाच संपवले जात असेल तर तुम्ही समजून जा की लोकशाही संपलेली आहे. तिला संपवण्यात आलेलं आहे. याकडे आपण आणीबाणी प्रमाणेच बघितले पाहिजे. वन नेशन वन पार्टी या अती महत्वाकांक्षेकडे सध्या भाजप जाताना दिसते. मोठा लढा देऊन आपण जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वतंत्र नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे. अशी जहरी टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

प्रीती शर्मा मेनन

तात्पुरती घातलेली बंदी हा दोन्ही गटांवर अन्याय : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यावर निवडणूक आयोगाने तात्पुरती घातलेली बंदी हा दोन्ही गटांवर अन्याय असल्याचे म्हटले आहे. जूनमध्ये शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट खरी शिवसेना असल्याचा दावा करत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी मागत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.