मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी नुकतीच जागतिक आर्थिक परिषद पार ( Davos World Economic Forum ) पडली. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले ( Foreign Investment In Maharashtra ) आहेत. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
दावोस येथील विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.
-
A great success for Magnetic Maharashtra 2.0 program today at @WEF #Davos2022. A total of 23 MoUs worth USD 4 Bn (INR 30k cr) were signed which will generate 66k jobs in Maharashtra @CMOMaharashtra , @midc_CEO pic.twitter.com/Tp6YldIFvc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A great success for Magnetic Maharashtra 2.0 program today at @WEF #Davos2022. A total of 23 MoUs worth USD 4 Bn (INR 30k cr) were signed which will generate 66k jobs in Maharashtra @CMOMaharashtra , @midc_CEO pic.twitter.com/Tp6YldIFvc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 23, 2022A great success for Magnetic Maharashtra 2.0 program today at @WEF #Davos2022. A total of 23 MoUs worth USD 4 Bn (INR 30k cr) were signed which will generate 66k jobs in Maharashtra @CMOMaharashtra , @midc_CEO pic.twitter.com/Tp6YldIFvc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 23, 2022
या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश असल्याचेही देसाई म्हणाले.
हेही वाचा : Aditya Thackeray Criticized BJP : मी फालतू विषयांवर बोलत नाही - आदित्य ठाकरे