ETV Bharat / city

मुंबईतील वांद्रे परिसरात 3 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 19 जण गंभीर जखमी - Bandra area building collapsed news

वांद्रे परिसरात काल रात्री १२:३० च्या सुमारास तीन मजली इमारत ( Building collapsed in Bandra area in Mumbai ) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, ४ अग्निशमन दल, पोलीस, १ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले.

building collapsed in Bandra area in mumbai
वांद्रे येथील तीन मजली इमारत कोसळली
author img

By

Published : Jun 9, 2022, 7:17 AM IST

Updated : Jun 9, 2022, 9:31 AM IST

मुंबई - वांद्रे परिसरात काल रात्री १२:३० च्या सुमारास तीन मजली इमारत ( Building collapsed in Bandra area in Mumbai ) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, ४ अग्निशमन दल, पोलीस, १ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व सुरक्षित आहेत. हे सर्व लोक बिहारमधील मजूर आहेत. ढिगाऱ्याखाली ३ ते ४ लोक अडकल्याची शक्यता बीएमसीने व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू असल्याचे बीएमसीने सांगितले.

बचावकार्याचे दृश्य

हेही वाचा - Maharashtra Monsoon Updates : येत्या २४ तासांत राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता? - शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे.

घटना स्थळावरील दृश्य

एका व्यक्तीचा मृत्यू, १६ गंभीर जखमी - घटनेबाबत माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व बिहारमधून आलेले मजूर आहेत.

जखमींची नावे -

1) खुदास शेख (५७ वर्षे)
2) मग्ल्या शेखुद्दिन (४० वर्षे)
३) फाहाजन रेहमान शेख (१९ वर्षे)
४) शमिऊल्ला शेख (३९ वर्षे)
५) येशुद्दिन शेख (५० वर्षे)
६) जरिफुल्लाह रेसुद्धिन शेख (३६ वर्षे)
७) जहांगीर सय्यद शेख (४६ वर्ष)
8) जुल्फिकार शेख (३2 वर्ष)
९) फेजन आलिसन शेख (३2 वर्ष)
१०) शहातोराब मुजुरालम शेख (३३ वर्ष)
११) सलीम उस्मान शेख (१६ वर्ष)
१२) साबीर रिजाऊल आलम (४२ वर्ष)
१३) अफाकल हलिया शेख (६३ वर्ष)
१४) मनावरालंम हुसैन उल्लार (३३ वर्ष)
१५) नुरेआलाम अकबर हसिया (२२ वर्ष)
१६) आली अहमद मंजिर शेख (६५ वर्ष)
17) शमी अहमद शेख (४० वर्ष)

या सर्व जखामींना भाभा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असून शहानवाज आलम वय ५६ याचा मृत्यू झाला असल्याचे भाभा रुग्णालयातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेरणा यांनी स्पष्ट केले. मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तसेच, अजूनही मलब्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्थानिकांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी बिल्डरने या इमारतीला लागून असलेले घर पाडले होते.

हेही वाचा - Cm Uddhav Thackeray : फडवणीस म्हणतात गधाधारी, आम्ही 'गधा' सोडलायं; उद्धव ठाकरेंचा टोला

Last Updated : Jun 9, 2022, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.