ETV Bharat / city

पोटासाठी वणवण फिरणाऱ्या आजोबांची इंग्रजी जोरात

author img

By

Published : Feb 20, 2022, 11:06 AM IST

दिवा स्टेशनवर 70 वर्षीय एम. जगन्नाथ यादव हे वृद्ध आजोबा आपल्या पोटासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून आले. ते दिवा स्टेशनवर इग्लिश पेपर वाचत बसले होते. त्यांची इग्रजी वाचणाची स्पीड तरूणाला लाजवेल अशी आहे. (Grandfather reading English at Diva Station) एम. जगन्नाथ यादव यांनी मदुराईच्या एसबीएन या महाविद्यालयातून डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पोटासाठी वणवण फिरणाऱ्या आजोबांची इंग्रजी जोरात
पोटासाठी वणवण फिरणाऱ्या आजोबांची इंग्रजी जोरात

मुंबई - दिवा स्टेशनवर 70 वर्षीय एम. जगन्नाथ यादव हे वृद्ध आजोबा आपल्या पोटासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून आले. ते दिवा स्टेशनवर इग्लिश पेपर वाचत बसले होते. त्यांची इग्रजी वाचणाची स्पीड तरूणाला लाजवेल अशी आहे. एम. जगन्नाथ यादव यांनी मदुराईच्या एसबीएन या महाविद्यालयातून डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. (grandfather reads fast English at the Diva station) तसेच, काही बेसिक कंप्यूटर कोर्स ही त्यांनी केले आहेत. (reads fast English at the Diva station) मात्र, नोकरी करण्याच्या उद्देशाने जवळपास तीस वर्षे आधी त्यांनी महाराष्ट्र गाठले.

व्हिडिओ

मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी आपला वेगळा संसार थाटला

महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी त्यांनी एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी इन्चार्ज ऑफिसर म्हणून काम केल आहे. मात्र, तिथे एक ते दीड वर्ष काम केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. त्यानंतर मुंबईत असेच मुंबईजवळच्या असलेल्या अनेक ठिकाणी खासगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून त्यांनी काम केल आहे. एम जगन्नाथ यादव यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे. सध्या ते दिवा या परिसरात राहतात. त्यांच्या मुलगा आणि मुलीचे लग्न झाले असून मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी आपला वेगळा संसार थाटला आहे. त्यामुळे आता मुलगा आपल्याकडे लक्ष देत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

इच्छा असूनही कोणीही आपल्याला कामावर घेत नाही

लग्नानंतर यादव यांची मुलगी आपल्याकडेच राहायला आली. सध्या ती गरोदर असल्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचना आहे. आपले वय आता 70 च्या वर झाले असून प्रकृती ढासळत चालल्याने, आपल्याला आजारांनी ग्रासले आहे. आपली प्रकृती आता व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे कामावर जाण्याची इच्छा असूनही कोणीही आपल्याला कामावर घेत नाही अशीही खंत त्यांनी बोलावून दाखवली.

हेही वाचा - Third Front Movements: केसीआर यांची आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.