मुंबई - ऐन दही हंडीच्या सणादिवशी मुंबईत दुर्घटना घडली four storey building collapsed आहे. मुंबईतील बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली. Saibaba Nagar of Borivali West in Mumbai
मुंबईच्या बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील गीतांजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तळ अधिक तीन मजली ही इमारत आहे. दुपारी १२.३४ वाजता याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. ही इमारत धोकदायक म्हणून जाहीर करून खाली करण्यात आली होती. तरीही आत कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
28 जून 2022 ला कुर्ल्यात कोसळली होती इमारत कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोडवरील नाईक नगर सोसायटीमधील एका इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला The building of Naik Nagar Society collapsed . एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३२ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ऑडिटरची चौकशी करून करावी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
![मुंबईतील बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/55-mh-mh10066_19082022134157_1908f_1660896717_607.jpg)