मुंबई : मुंबईतील वाडिया हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला आग ( Fire operation theater of Wadia Hospital ) लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉस्पिटलमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या पेडियाट्रिक ऑपरेशन थिएटर जवळ ही आग लागली आहे. अग्निशमन दल ( fire brigade ) घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र
घटनेत जीवितहानी नाही - परेल येथील प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरजवळ आज सायंकाळी ७ च्या सुमारास आग लागली. रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या पेडियाट्रिक ऑपरेशन थिएटर जवळ युपीएस रुमला आग लागली असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धूर पसरला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तसेच ६ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'