ETV Bharat / city

Bullet Train : ठाण्यात समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार; देशातील पहिला भुयारी मार्ग - देशातील हा पहिलाच प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वांद्रे - कॉम्प्लेक्स ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यान बुलेट ट्रेन (A Bullet Train Will Run Between) धावणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने याकरिता समुद्राखालून भुयारी मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला असून; देशातील हा पहिलाच प्रकल्प (Thane Bandra Kurla Complex Through The Subway Mumbai) आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

Bullet Train
बुलेट ट्रेन धावणार
author img

By

Published : Sep 24, 2022, 12:34 PM IST

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वांद्रे - कॉम्प्लेक्स ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यान बुलेट ट्रेन ( A Bullet Train Will Run Between) धावणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने याकरिता समुद्राखालून भुयारी मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला असून; देशातील हा पहिलाच प्रकल्प (Thane Bandra Kurla Complex Through The Subway Mumbai) आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रकल्पाला संमती : मुंबई ते ठाणे महामार्गावर वाहनांची मोठी रेलचेल असते. सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तांत्रिक अडचणीमुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचे अनेकदा वेळापत्रक कोलमडून पडते. यावर फुंकर घालण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेन सुरू करणार आहे. बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गुजरात पेक्षा सर्वाधिक भुर्दंड या महामार्गासाठी राज्य सरकारला सोसावा लागणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला होता. आता सत्तांतर होऊन शिंदे - फडणवीस सत्तेत आल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. आता वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा पर्यंत भुयारी मार्गाने बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला संमती दर्शवली असल्याचे समजते.

असा असेल प्रकल्प : वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यान बांधण्यात येणारा समुद्राच्या तळाचा भुयारी मार्ग सात किलोमीटरचा असणार आहे. टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड वापरून हा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. भारतातील हा पहिलाच भुयारी मार्ग असेल, असे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे म्हणणं आहे. हा भुयारी मार्ग 13.1 मीटर व्यासाचा आणि सिंगल- ट्यूब ट्वीन - ट्रॅक स्वरूपाचा असणार आहे. या भुयारी मार्गाला 37 ठिकाणी 39 इन्स्ट्रुमेंट रूम बांधण्यात येतील सुमारे 16 किलोमीटर लांबीचा हा बोगदा करण्यासाठी तीन टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येतील. उर्वरित पाच किलोमीटर रस्त्यासाठी ऑस्ट्रेलिया टर्निंग मेथड मशीनचा वापर केला जाईल. सुमारे 25 ते 65 मीटर खालून हा भुयारी मार्ग जाणार आहे. पारसिक टेकडीच्या खालून सर्वाधिक 114 मीटर खोल हा भुयारी मार्ग जाणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.