ETV Bharat / city

मुंबईतील इमारतीत कोरोनाचे ९० टक्के रुग्ण.. फोर्ट, ग्रँट रोड, अंधेरी, वांद्र्यात बाधितांची संख्या सर्वाधिक - मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढली

मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. १ डिसेंबरला १०८ वर आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट साडेपाच हजारांवर गेल्याने तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत आहेत. मात्र या रुग्णसंख्येत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमधील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

corona patients in Mumbai building
corona patients in Mumbai building
author img

By

Published : Jan 1, 2022, 3:11 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत तब्बल ९० टक्के रुग्ण उच्च्चभ्रू वस्तीतील इमारतींमधील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यात ए विभाग कुलाबा-फोर्ट, डी विभाग ग्रांट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्रे पूर्व-पश्चिममध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना -

मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. १ डिसेंबरला १०८ वर आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट साडेपाच हजारांवर गेल्याने तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत आहेत. मात्र या रुग्णसंख्येत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमधील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळावर होणार्‍या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित असल्याचे स्पष्ट होत नसले तरी काही दिवसांनी हेच प्रवासी बाधित होत आहेत. या काळात संबंधित प्रवाशांचा कुटुंबासह अनेकांशी संपर्क येत असल्यामुळे, मीटिंग-कार्यक्रमांना हजेरी लावली जात असल्यामुळेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना वेगाने फैलावत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

दहा दिवसांत सक्रिय रुग्णसंख्येत वाढ -

'के' पश्चिम अंधेरी पश्चिम विभागात १९ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या २७७ होती. या विभागात ३१ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १४४० वर पोहोचली आहे. के पूर्व अंधेरी पूर्व विभागात १९ डिसेंबर रोजी १५९ असणारी रुग्णसंख्या ३१ डिसेंबर रोजी ७५६ वर पोहोचली आहे. वांद्रे पूर्व विभागात ६० असणारी सक्रिय रुग्णसंख्या ३१ डिसेंबर रोजी ५१२ वर पोहोचली आहे. तर वांद्रे पश्चिम विभागात सक्रिय रुग्णांची संख्या १४९ वरून १०८५ वर पोहोचली आहे. डी विभाग ग्रँट रोड गिरगाव परिसरातही रुग्णवाढ कायम असून या ठिकाणी १३६ असणारी सक्रिय रुग्णांची संख्या ३१ डिसेंबर रोजी ९५८ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १९ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत २०८१ वरून ११३६० वर पोहोचली आहे.

अशी घ्या खबरदारी -

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये येणारे घरकामगार, ड्रायव्हर, वॉचमन आदींची आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी करून घ्यावी आणि बाधितांना क्वारंटाइन करावे. संबंधितांसाठी असणार्‍या स्वच्छतागृहांचे दिवसातून चार ते पाच वेळा सॅनिटायझेशन करावे, गर्दीच्या सोहळ्यांचे आयोजन करू नये, परदेशातून आलेल्यांनी सात दिवस सक्तीने आणि काटेकोरपणे क्वारंटाइन नियम पाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.