ETV Bharat / city

राज्यात म्युकरमायकोसिसचे 8920 रुग्ण, 1014 जणांचा मृत्यू - mucormycosis patients in state

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याचे सामोर आले आहे. 25 मे पासून आतापर्यंत या आजाराचे 8920 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल 1014 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक मृत्यू हे पुणे, मुंबई आणि नागपूर येथे नोंदविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिस
म्युकरमायकोसिस
author img

By

Published : Jul 6, 2021, 10:54 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याचे सामोर आले आहे. 25 मे पासून आतापर्यंत या आजाराचे 8920 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल 1014 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक मृत्यू हे पुणे, मुंबई आणि नागपूर येथे नोंदविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

8920 रुग्णांची नोंद -

बुरशी म्हणजेच फंगसचे वर्षाला चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यावर या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 25 मे ला राज्यात कोरोना झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले. आतापर्यंत 8 हजार 920 जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 4 हजार 357 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 395 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सध्या नवे रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

1014 मृत्यू -

म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत 1014 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथे 178, मुंबई येथे 129 तर नागपूर येथे 118 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

खर्च पाहून रुग्ण घेतात डिस्चार्ज -

म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत. मात्र खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 10 ते 15 लाख रुपयांचा खर्च होत आहे. हा खर्च पाहून खासगी रुग्णालयातील रुग्ण डिस्चार्ज घेत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.