मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज सोमवारी 25 ऑक्टोबरला 889 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 12 मृत्यूंची नोंद झाली असून 1586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.47 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा - ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला लागणार कात्री!
23,184 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 889 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 3 हजार 850 वर पोहोचला आहे. तर, आज 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 28 वर पोहोचला आहे. आज 1586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 37 हजार 25 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.47 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 19 लाख 78 हजार 155 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.66 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 83 हजार 92 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 23 हजार 184 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638, 20 ऑक्टोबरला 1825, 21 ऑक्टोबरला 1573, 22 ऑक्टोबरला 1632, 23 ऑक्टोबरला 1701, 24 ऑक्टोबरला 1410, 25 ऑक्टोबरला 889 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 263
अहमदनगर - 110
पुणे - 76
पुणे पालिका - 57
हेही वाचा - VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्ठ जयंत यांच्याशी खास मुलाखात..