ETV Bharat / city

Maharashtra Nagarpanchayat Election : नगरपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81 टक्के मतदान

author img

By

Published : Jan 19, 2022, 12:20 AM IST

राज्यातील नगपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध महानगरपालिकांतील पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार ( Maharashtra Nagarpanchayat And Zilla Parishad Election ) पडले. त्यानुसार नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी सरासरी 81, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Maharashtra Nagarpanchayat Election
Maharashtra Nagarpanchayat Election

मुंबई - राज्यातील नगपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार ( Maharashtra Nagarpanchayat And Zilla Parishad Election ) पडले. त्यानुसार, 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी सरासरी 81, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ( Maharashtra Election Commission ) 21 डिसेंबर 2021 रोजी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला. त्यानुसार, राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद ( Bhandara Gondia Zilla Parishad Election ) आणि त्यामधील 15 पंचायत समित्या आणि चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 73 टक्के मतदान झाले. तर भंडारा जिल्हा परिषदेसाठी 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेसाठी 10 टक्के मतदान झाले. तसेच, राज्यातील विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतीतील 209 रिक्तजागांच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 76 टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी (19 जानेवारी) रोजी होणार ( Maharashtra Election Vote Counting ) आहे.

हेही वाचा - Mumbai Naval Dockyard Accident : आयएनएस रणवीरमध्ये स्फोट; 3 नौदल जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.