मुंबई - आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 801 रुग्णांची नोंद झाली असून, 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सतरा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 139 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 10 हजार 122
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 801 नवे रुग्ण आढळून आले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 32 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 16 पुरुष तर 7 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 52 हजार 888 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 122 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1043 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 22 हजार 501 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 290 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 139 दिवस तर सरासरी दर 0.50 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 622 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 400 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 14 लाख 68 हजार 481 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.