ETV Bharat / city

Omicron - मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ८ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३१ वर - मुंबई ओमायक्रॉन विषाणू ८ नवे रुग्ण

मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ८ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३१ झाली आहे.

mumbai
मुंबई
author img

By

Published : Dec 21, 2021, 8:41 PM IST

मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ८ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. त्यापैकी १८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - Keshav Upadhye Critisize Nawab Malik : 'परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी नवाब मलिकांचा संबंध, अधिवेशनात पुढे येईल'

रुग्णांचा आकडा ३१ वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १० हजार ३९४ प्रवासी आले. त्यापैकी ३७ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ६५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एनआयव्ही, पुणे ) येथे जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ३१ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

आज ८ रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह -

मुंबईत आज ओमायक्रॉनचे ८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. आज आढळून आलेल्या ८ रुग्णांपैकी ६ रुग्ण हे विमानतळावर तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना विमानतळावरून थेट रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर, उर्वरित २ रुग्ण व १ सहवासीत जोखमीच्या देशातून आले नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असता त्यांनाही रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा - Azad Maidan Teachers Protest : बुधवारी राज्यभरातील शिक्षक विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात धडकणार !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.