ETV Bharat / city

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये मुंबईत ‘डेल्टा’चे ७५ टक्के, तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळले - ईटीव्ही भारत

मुंबईमध्ये चाचणी करण्यात आलेल्या २८१ नमुन्यांपैकी ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ७५ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. लसीकरण झालेल्यांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे.

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये मुंबईत ‘डेल्टा’चे ७५ टक्के, तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळले

author img

By

Published : Nov 12, 2021, 5:16 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये चाचणी करण्यात आलेल्या २८१ नमुन्यांपैकी ‘डेल्टा व्हेरिअंट’चे ७५ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे २५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. लसीकरण झालेल्यांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. कोविड प्रतिबंधक लस घेणे, निर्देशांचे कठोर पालन आवश्यक असल्याचे पालिकेकडून करण्यात आलेल्या चौथ्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालातून समोर आले आहे.

चाचण्यांचा निष्कर्ष -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार गेले दीड वर्ष आहे. या दीड वर्षात विषाणूने आपली रूपे अनेक वेळा बदलली आहेत. विषाणूच्या कोणत्या प्रकाराचे रुग्ण आढळून येत आहेत यासाठी पालिकेकडून जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातात. पालिकेने केलेल्या चौथ्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या निष्कर्षानुसार २८१ पैकी २१० रुग्ण (७५ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ७१ रुग्ण (२५ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. २८१ पैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तसेच त्यांचे वयदेखील ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील २८१ रुग्णांपैकी २६ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ८५ रुग्ण (३० टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९६ रूग्ण (३४ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ६६ रुग्ण (२३ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ८ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.

लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू -
कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या २८१ पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त ८ जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढवला नाही. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ६९ नागरिकांना बाधा झाली. त्यातील १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तिघांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर चार जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले चारही रुग्ण ६० वर्ष वयांवरील वयोवृद्ध होते. यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते. तर अन्य दोघांना कोणतेही आजार नव्हते. या चौघा रुग्णांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. हे चारही रुग्ण कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर २ ते ५ दिवसांच्या विलंबाने रुग्णालयात दाखल झाले. ते देखील त्यांच्या जीवावर बेतले.

या आधी झाल्या तीन चाचण्या -
जनुकीय सूत्राचे निर्धारण म्हणजेच नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून यापूर्वी सर्वप्रथम २३ ऑगस्ट २०२१ रोजी, दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तिसऱ्यांदा कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

कोरोना नियमांची अंमलबजावणी करा -
कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झाले आहे. नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्यांचे निष्कर्ष पाहता असे लक्षात येते की, सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे देखील कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुखपट्टी (मास्क)चा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी. या सर्व बाबी प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट BMC आज पूर्ण करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.