मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गुरुवारी 666, शुक्रवारी 762, शनिवारी 696, तर रविवारी 733 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 726 दिवसांवर पोहचला आहे.
हेही वाचा - शालेय शिक्षण विभागाकडून 'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या सूचना नाहीच
रुग्ण दुपटीचा कालावधी 726 दिवसांवर
मुंबईत आज 733 रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 21 हजार 370 वर पोहचला आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 298 वर पोहचला आहे. आज 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 88 हजार 990 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 809 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 726 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 15 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 80 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी रविवारी 28 हजार 226, तर आतापर्यंत एकूण 68 लाख 15 हजार 28 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - Pratap Sarnaik Issue : शिवसेनेने भाजपशी युती करावी, सरनाईकांच्या भूमिकेचे स्वागत - रामदास आठवले