ETV Bharat / city

नात्यातील गुंतागुंत... मुलीसोबत लग्न केल्याने 70 वर्षीय वृद्धेला राग, 57 वर्षीय बॉयफ्रेंडवर हातोड्याने वार!

57 वर्षीय प्रियकराचा खून(Boyfriend Murder in wadala) केल्याप्रकरणी मुंबईत 70 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीसोबत त्या प्रियकराने लग्न केल्याने महिलेला राग अनावर झाला होता. मुंबईतील वडाळा(Wadala Crime) येथे ही घटना घडली आहे.

murder
murder
author img

By

Published : Nov 19, 2021, 4:55 PM IST

Updated : Nov 19, 2021, 5:24 PM IST

मुंबई - 57 वर्षीय प्रियकराचा खून(Boyfriend Murder in wadala) केल्याप्रकरणी मुंबईत 70 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. बुधवारी वडाळ्यातील त्यांच्या राहत्या घरात हे हत्याकांड घडले होते. रागाच्या भरात हातोड्याने वार करुन वृद्धेने प्रियकराचा खून(Woman killed Boyfriend) केल्याचा आरोप आहे. या महिलेच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीसोबत त्या प्रियकराने लग्न केल्याने महिलेला राग अनावर झाला होता.

  • काय आहे प्रकरण?

70 वर्षीय शांती पाल(Shanti Pal) आणि 57 वर्षीय बिमल खन्ना(Bimal Khanna) यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, शांती पाल यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलीशी बिमल खन्ना याने लग्न केले होते. खन्नाने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, या भावनेतून शांती पाल यांच्या संतापाचा पारा चढला होता.

  • नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री उशिरा बिमल खन्ना घरी आला असता, त्याचे शांती पाल यांच्याशी भांडण झाले. रागाच्या भरात त्यांनी प्रियकराच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, अशी माहिती वडाळा टीटी पोलीस स्टेशनचे(Wadala TT police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. आधीच ब्रेन स्ट्रोकवर औषधोपचार सुरु असलेले खन्ना या हल्ल्यानंतर बेशुद्ध पडले.

  • 35 हून अधिक वर्षांचा सहवास -

पोलिसांनी सांगितले की, शांती पाल आणि त्यांची मुलगी 1984 च्या दंगलीनंतर पंजाबमधून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट बिमल खन्ना याच्याशी झाली. त्यांनी मायलेकींना आश्रय दिला होता. पाल आणि खन्ना एकत्र राहत होते. या नात्यातून त्यांना एक मुलगीही झाली आहे.

  • नात्यांचा गुंता -

दरम्यान, बिमल खन्ना यांनी शांती पाल यांच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीशी लग्न केले. या नात्यांच्या गुंत्यामुळे शांती पाल भडकल्या होत्या. भांडणानंतर संतापाच्या भरात त्यांनी खन्नावर हातोड्याने वार केल्याचा आरोप केला जात आहे.

  • रुग्णालयात दिली खोटी माहिती -

बुधवारी शांती पाल यांनी खन्ना यांना सायन रुग्णालयात दाखल केले होते. ते घरात कोसळल्याचे पाल यांनी डॉक्टरांना सांगितले. मात्र, शवविच्छेदनात खरी माहिती समोर आली. यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी शांती पाल यांना ताब्यात घेतले. अखेर पाल यांनी हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Nov 19, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.