मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर (st workers strike) गेले आहे. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची (st workers suspension) कारवाई सुरूच ठेवली असून, ९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज कामावर येणाऱ्यांची संख्या ७ हजार ६२६ झाली आहे (St employees join office).
हेही वाचा - देवेंद्रजी स्वप्न बघायचं बंद करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तुम्ही नाही.. मलिकांचा फडणवीसांवर घणाघात
एसटी कर्मचारी निलंबन; 7 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कर्तव्यावर हजर
एसटी महामंडळ (msrtc) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे, न्यायालयाने सुद्धा संप करण्यास नकार दिला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध स्टँडवरून खासगी बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली. या शिवाय एसटी महामंडळाने कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे आवाहन केले. तरी सुद्धा कर्मचारी कामावर हजर होत नव्हते. शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज राज्यभरात ७ हजार ६२६ कर्मचारी कामावर आले आहे (ST employees join office).
अशी आहे आकडेवारी -
शनिवारी ३ हजार १६६ कर्मचारी कामावर रुजू झाले असतानाच रविवारी हीच संख्या ३ हजार ९८७ पर्यंत पोहोचली. तर, सोमवारी यात वाढ होऊन ६ हजार ८९५ कर्मचारी कामावर आले. तर, आज ७ हजार ६२६ कर्मचारी कामावर हजर झाले आहे. यात चालक २९५, वाहक १३६, प्रशासकीय ५ हजार २७४, तर कार्यशाळेतील १ हजार ९१८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही संख्या आणखी वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
एसटी कर्मचारी संप; आज एसटीतून ८२४ प्रवाशांनी केला प्रवास
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातून १२ मार्गावर, शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण ५६ बसेस धावल्या आहेत. या बसेसमधून ८२४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. आजपेक्षा काल दिवसभरात जास्त बसेस सुटल्या होत्या. सोमवारी राज्यभरातून बस संख्या १३४ सोडण्यात आलेल्या होत्या, ज्यामधून २ हजार ८५३ प्रवाशांनी प्रवास केला होता.
हेही वाचा - Corona Update : राज्यात आढळले 886 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू