ETV Bharat / city

मुंबईत 1432 नवीन कोरोना बाधितांची नोंद, 31 रुग्णांचा मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत शनिवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 22 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 23 पुरुष तर 8 महिला रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 43 हजार 389 रुग्ण असून 1 लाख 15 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 593 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 974 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाच्या नव्या 1432 नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : Aug 30, 2020, 6:43 AM IST

Updated : Aug 30, 2020, 7:07 AM IST

मुंबई - मुंबईत शनीवारी कोरोनाचे 1432 नवे रुग्ण आढळून आले असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 43 हजार 389 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 593 वर पोहोचला आहे. मुंबईमधून शनिवारी 682 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 15 हजार 500 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 974 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवसांवर पोहोचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत शनिवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 22 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 23 पुरुष तर 8 महिला रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 43 हजार 389 रुग्ण असून 1 लाख 15 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 593 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 974 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवस तर सरासरी दर 0.79 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 556 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 916 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 7 लाख 53 हजार 869 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Aug 30, 2020, 7:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.