ETV Bharat / city

मुंबईत ६ वर्षांत अनधिकृत बांधकामांच्या ६८ हजार तक्रारी, २९ हजार बांधकामे जमीनदोस्त - बांधकामे जमीनदोस्त

मुंबईत मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे ( Illegal Construction in Mumbai ) केली जातात. गेल्या सहा वर्षात अनधिकृत बांधकाबाबत महापालिकेच्या इमारत व कारखाने विभागाकडे तब्बल ६७ हजार ८०९ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी फक्त २९ हजार २७३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात पालिकेला ( Demolished by BMC ) यश आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : Dec 9, 2021, 4:06 AM IST

मुंबई - मुंबईत मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे ( Illegal Construction in Mumbai ) केली जातात. गेल्या सहा वर्षात अनधिकृत बांधकाबाबत महापालिकेच्या इमारत व कारखाने विभागाकडे तब्बल ६७ हजार ८०९ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी फक्त २९ हजार २७३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात पालिकेला यश ( Demolished by BMC ) आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आली आहे.

६७ हजार ८०९ तक्रारी, २९ हजार २७३ बांधकामे जमीनदोस्त -

मुंबईत मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभी राहत आहेत. विशेषतः मुंबईत लागोपाठ सुट्ट्या लागल्या की या दिवशी बेकायदा बांधकामांना वेग येतो. मुंबईत भू-माफिया सक्रिय असून मोकळा भूखंड दिसेल तिकडे जागा बळकावत बेकायदा बांधकाम उभारले जात आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने २०१६ पासून आरटीईएमएस संगणक प्रणाली राबवण्यास सुरुवात केली आहे. या प्रणालीच्या आकडेवारीनुसार गेल्या ६ वर्षांत तब्बल ६७ हजार ८०९ तक्रारी आल्या. या तक्रारीची दखल घेत ६ वर्षांत २९ हजार २७३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तर उर्वरित अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा लवकरच उगारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांवर टप्या टप्प्याने कार्यवाही करण्यात येत असून पंचनामे, नोटीस देणे, कागदपत्रांची पडताळणी करुन अंतिम आदेश दिले जात आहेत. दिवाणी, उच्च व सर्वोच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामांची प्रकरणे प्रलंबित असून योग्य ती कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाने स्थायी समितीत केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

अतिक्रमणाचा शोध आता सेटलाईटद्वारे !

गेल्या काही वर्षांत मुंबईत अतिक्रमण वाढली असून बेकायदा बांधकामे, अतिक्रमण याचा शोध उपग्रहावरुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९० ते २०२० पर्यंतच्या सेटलाईटवरुन घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यानंतर भविष्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे. तसेच अनधिकृत बांधकाम प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अनधिकृत बांधकाम न्यायालयात सिद्ध करण्यास मदत होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा - Corona Update - राज्यात कोरोनाचे 893 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.