ETV Bharat / city

दिलासादायक.. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी 233 दिवसांवर, आज ५३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. शिवाय करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडत आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा रुग्णांचा आकडा 2 लाख 38 हजार 086 वर गेला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 374 सक्रिय रुग्ण आहेत.

corona patients registered in Mumbai
मुंबई कोरोना
author img

By

Published : Nov 10, 2020, 10:12 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज नव्या 535 रुग्णांची नोंद झाली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 29 दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 233 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण, मृतांचा आकडा कमी -
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 535 नवे रुग्ण आढळून आले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 18 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 6 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 65 हजार 677 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 481 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1057 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 38 हजार 086 वर गेला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 374 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 233 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 233 दिवस तर सरासरी दर 0.30 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 498 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 085 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 36 हजार 080 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.