ETV Bharat / city

खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांची 50 टक्केच उपस्थिती; 'ई टीव्ही भारत'चा रियालिटी चेक

राज्यात कोरोनाने उच्चांकी आकडा गाठला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

reality check
रियालिटी चेक
author img

By

Published : Mar 20, 2021, 6:24 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाने उच्चांकी आकडा गाठला आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती हवी असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून सर्वच सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. मुलुंडमधील एका खासगी कार्यालयातून 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे.

मुंबईतील खासगी कार्यालयामधून प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - आता धावत्या लोकलमध्ये मिळणार मास्क; मध्य रेल्वेने मास्क विक्रीला दिली परवानगी

कोरोना नियमांचे पालन करण्याच आवाहन

शासकीय निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये आजपासून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांची मर्यादा ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख हा सतत वाढत चालला आहे. त्यामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व पालिका क्षेत्रांमध्ये तसेच जिल्हा पातळीवर देखील प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत यापुढे सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आस्थापनांमध्ये फक्त पन्नास टक्केच स्टाफ हा कार्यालयांमध्ये बोलवावा असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर देखील अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून कार्यवाही देखील केली जाणार आहे.

कार्यालयात कर्मचाऱ्यांची 50 टक्केच उपस्थिती-

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतबाबत सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. आम्ही आमची कर्मचारी संख्या 50 टक्केपर्यंत आणली आहे. एक दिवस आड पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे. कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर, गरम पाणी, आयुर्वेदिक काढा अशा विविध सोयी करण्यात आल्या आहेत. भविष्यात देखील कोरोनाची रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी राज्य सरकार जे निर्बंध लावेल त्याचे आम्ही पालन करू, असे आर सी जैन & असोसिएटचे एम डी रत्नेशचंद्र जैन यांनी सांगितले.

हेही वाचा - दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.