ETV Bharat / city

भाजपकाळात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन अधिक! - सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा

भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर सतत शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानकडून घडत असतात. 2020 या वर्षामध्ये पाकिस्तानकडून भारत - पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 4665 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
author img

By

Published : May 28, 2021, 5:11 PM IST

Updated : May 28, 2021, 6:10 PM IST

मुंबई - भारतातून पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर अजूनही भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर सतत शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानकडून घडत असतात. 2020 या वर्षामध्ये पाकिस्तानकडून भारत - पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 4665 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 17 वर्षांत पाकिस्तानने तब्बल 11 हजार पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समोर येत आहे. 'ई टीव्ही भारत'चा यावरचा विशेष रिपोर्ट...

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा
  • युपीएकाळात शस्त्रसंधीचे उल्लंघन कमी

भारत आणि पाकिस्तानला विभागणारी 725 किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोलची बॉर्डर आहे, जी जम्मू-काश्मीरला दोन विभागात मोडते. सामाजिक कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी माहिती अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीवरून समोर आले आहे की, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन हे सतत होत असून यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग असताना 2004 ते 2013 या दरम्यान केवळ 523 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर केलं आहे. 2004 मध्ये पाकिस्तानकडून केवळ एकदाच शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 2005 मध्ये सहा वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, 2006 मध्ये 3 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

हेही वाचा - खुशखबर.. एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार मान्सून

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन 2007 पासून वाढल्याचे दिसून येत आहे. 2007मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन 21 वेळा झाले असून, सन 2008 मध्ये 70 वेळा, 2009 मध्ये 28 वेळा, 2010 मध्ये 44 वेळा, 2011 मध्ये 51 वेळा तर 2012 मध्ये 93 वेळा, 2013 मध्ये 199 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

  • भाजपकाळात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन अधिक

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील यूपीए सरकारच्या काळामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे प्रमाण हे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते. मात्र, 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला असून, बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन पाहायला मिळाले आहे. याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर 2014 मध्ये 153 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, 2015 मध्ये 152, 2016 मध्ये 228, 2017 मध्ये 860 वेळा, 2018 मध्ये 1629 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, 2019 मध्ये हेच प्रमाण वाढत 3233 वेळा, तर 2020 मध्ये सर्वाधिक 4645 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानने केले आहे. जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या दोन महिन्याच्या काळामध्ये तब्बल 524 वेळा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

हेही वाचा - सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

  • भाजपकडून पाकिस्तानला कुठल्या भाषेत उत्तर - प्रफुल्ल सारडा, सामाजिक कार्यकर्ते

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी वनी बुर्हानी यास भारतीय लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर ऊरी व पुलवामासारख्या दहशतवादी हल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये भारतीय सैन्य दलातील जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. या नंतर भाजप शासित सरकारकडून पाकिस्तान मधील लॉन्च पॅड वर सर्जिकल स्ट्राइक व बालाकोट येथे आतंकवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्प वर एअर स्ट्राइक करण्यात आलेला होता . त्यानंतरच भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. एकीकडे युपिए काळामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन हे खूपच कमी वेळा झालेला आहे .मात्र , भाजप काळामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं संसदेत म्हटल्यानंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना या वारंवार घडत असून नक्की भाजपकडून कुठल्या प्रकारचे उत्तर पाकिस्तानला दिले जात आहे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी केला आहे.

  • पाकिस्तानने घेतलाय धसका- अ‌ॅड धनराज वंजारी

ज्येष्ठ रक्षा तज्ज्ञ अ‌ॅड. धनराज वंजारी यांच्या म्हणण्यानुसार, भाजपशासित सरकार देशात आल्यानंतर पाकिस्तानसाठी भाजप सरकार हे हिंदू धार्जिणे सरकार म्हणून वाटत असल्या कारणामुळे बॉर्डरवर शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानकडून सतत होत आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा भूभाग हा भारताच्या हाती लागतो काय? या भीतीमुळे पाकिस्तानकडून सतत काही ना काही कुरबुऱ्या बॉर्डरवर होतच असतात. अशातच भारताकडून कलम 370 हटविण्याची अंमलबजावणी काश्मीरमध्ये करण्यात आल्यानंतर त्याचा आणखीन धसका पाकिस्तानने घेतल्यामुळे भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने बॉर्डरवर त्यांचे सैन्य वाढवले असून याची परिणिती शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या माध्यमातून होत असल्याचं धनराज वंजारी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी स्वप्न पडण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार?'

Last Updated : May 28, 2021, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.