ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ४६ टक्के रक्कम खर्च - मुंबई महानगरपालिका २०२१ - २२ अर्थसंकल्प

मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेचा २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात भांडवली खर्चासाठी १८७५०.९९ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी डिसेंबर २०२१ पर्यंत ४६ टक्के रक्कम खर्च ( Mumbai Mnc budget amount spent ) करण्यात पालिकेला यश आले आहे.

Mumbai Mnc
मुंबई महापालिका
author img

By

Published : Feb 2, 2022, 9:00 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेचा २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात भांडवली खर्चासाठी १८७५०.९९ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी डिसेंबर २०२१ पर्यंत ४६ टक्के रक्कम खर्च ( Mumbai Mnc budget amount spent ) करण्यात पालिकेला यश आले आहे.

हेही वाचा - GST Compensation : निर्मला सीतारामन यांच्या भाषणात राज्यांना जीएसटी परताव्याचा उल्लेख नाही; राज्यांची डोकेदुखी वाढली?

मार्च महिन्यापर्यंत हा खर्च ६० टक्क्यांपर्यंत गेला तरी, ४० टक्क्यांची तरतूद शिल्लक राहणार आहे. मुंबई मलनिस्सारण प्रकल्पासाठी १ हजार ३३९ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही.

३९०३८ कोटी रुपयांचे मेगा बजेट -

कोरोनाचे संकट आणि महापालिका निवडणूक यांचा सुवर्णमध्य साधत २०२१ - २२ साठी आतापर्यंतचे ३९०३८.८३ कोटी रुपयांचे सर्वात मेगा बजेट पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सादर केले होते. २०२० - २१ च्या तुलनेत ११.५१ कोटी शिलकीचा असून ५७९७.९१ कोटी रुपये वाढ असलेल्या या अर्थसंकल्पात विकास प्रकल्प, शिक्षण, आरोग्य, शहराचे सौंदर्यीकरण यासाठी भरीव तरतूद करताना कोणतीही करवाढ न करता मुंबईकरांना खूष करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

४६ टक्के रक्कम खर्च -

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२० - २१ मध्ये भांडवली खर्चामधील केवळ ४५ टक्के रक्कम खर्च झाली होती. सन २०२१ - २२ च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी १८७५०.९९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण, यातील ८७५६.४६ कोटी रुपयेच म्हणजे ४६.७० टक्के खर्च ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खर्च झाले आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींपैकी १९९८ कोटी, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटींपैकी २९.६८ कोटी खर्च करण्यात आले आहेत.

मुंबई मलनिस्सारण प्रकल्पासाठी १३३९ कोटीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. विकास नियोजन विभागासाठी २२५१ कोटीची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी ९८.२६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. रस्ते वाहतुकीवर १३६७ कोटीची तरतूद केली, त्यापैकी १३५० कोटी खार झाले आहेत. पाणी पुरवठ्यासाठी १२३२ कोटीपैकी ५०८.४९ कोटी, आरोग्यासाठी १२१० कोटीपैकी ५४३.७५ कोटी, पर्जन्य जल वाहिन्यासाठी ९८५ कोटीपैकी ७५५ कोटी, मलनिस्सारण वाहिन्यांसाठी १०६० कोटीपैकी ४१३ कोटी, पूल विभागासाठी ८३० कोटीपैकी ६१२ कोटी, घन कचरा विभागासाठी ७५८ कोटीपैकी २१७ कोटी, पालिकेच्या मालमत्ता दुरुस्तीसाठी ६६७ कोटीपैकी ४०५ कोटी, शाळांच्या दुरुस्तीसाठी २४४ कोटीपैकी १६८ कोटी, इतर ३९९४ कोटीपैकी १६५७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मार्च महिन्यापर्यंत हा खर्च ६० टक्क्यांपर्यंत गेला तरी ४० टक्क्यांची तरतूद शिल्लक राहणार आहे.

मागील वर्षाच्या विशेष तरतुदी -

रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प - ६५११.७० कोटी
घन कचरा व्यवस्थापन - ४०५०.३० कोटी
आरोग्य - ४७२८.५३ कोटी
पर्जन्य जलवाहिन्या - १६९९.१३ कोटी
प्राथमिक शिक्षण - २९४५.७८ कोटी

इतर तरतुदी -

सागरी किनारा प्रकल्प - २००० कोटी
गोरेगाव मुलुंड लिंक रोड - १३०० कोटी
विकास नियोजन खाते - २५४६.६० कोटी
मुंबईचे सौंदर्यीकरण - २०० कोटी
कोविड संबंधी माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रणाली - ५१.८९ कोटी
सामुदायिक शौचालये - ३२३.२० कोटी
पूरप्रवण क्षेत्राचे निवारण - १५० कोटी
रेल्वेला पुलांसाठी - ९६१.६० कोटी
नद्यांचे पुनरुज्जीवन - ११४९.७४ कोटी
उद्याने - १२६.५३ कोटी
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) - ४९.६७ कोटी
मुंबई अग्निशमन दल - १९९.४७ कोटी
महापालिका मंडया - १२१.६३ कोटी

हेही वाचा - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'हे' महत्वाचे निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.