मुंबई - पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. २४ ते ३१ जुलै या आठवडाभरात मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. ( new cases of swine flu in Mumbai ) त्याचप्रमाणे मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ आजारांच्या रुग्ण संख्येतही वाढ झाल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
साथीच्या आजारात दुप्पट वाढ - मुंबईमध्ये १ ते २४ जुलै दरम्यान मलेरियाचे ३९७ रुग्ण, गॅस्ट्रोचे ५२४ रुग्ण, लेप्टो ३४, तर डेंग्यूच्या ५० रुग्णांची नोंद झाली होती. मात्र २४ ते ३१ जुलै या एका आठवड्यात मलेरियाच्या ५६३, गॅस्ट्रो ६७९, स्वाईन फ्ल्यू १०५, लेप्टो ६५ तर डेंग्यूच्या ६१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे.
रुग्ण संख्येत वाढ होणार - गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, पुढेही रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या चाचण्या करण्यात येणार असून, तसे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.
१ ते ३१ जुलैपर्यंत आकडेवारी
- मलेरिया - ५६३
- गॅस्ट्रो - ६७९
- स्वाईन फ्ल्यू - १०५
- लेप्टो - ६५
- डेंग्यू - ६१
- कावीळ - ६५
- चिकनगुनीया - २
१ ते २४ जुलैपर्यंत आकडेवारी
- मलेरिया - ३९७
- गॅस्ट्रो - ५२४
- स्वाईन फ्ल्यू - ६२
- डेंग्यू - ५०
- कावीळ - ५५
- लेप्टो - ३४
- चिकनगुनीया - १
हेही वाचा - CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ