मुंबई - मुंबईत विविध भागातून 40 रिक्षा चोरी गेल्या होत्या. दरम्यान, अंधेरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात तपास करत चोरांना पकडले आहे. तसेच 40 रिक्षा जप्त केल्या आहेत.
रिक्षा चोरी करून भाड्याने देण्याचा उपक्रम-
आरोपी इतका शातिर होता की तो वेगवेगळ्या भागातून रिक्षा चोरी करत होता. तसेच वसईतील गोदामात जाऊन रिक्षाच्या चेसी व नंबर प्लेट चेंज करून वेगवेगळ्या भागात त्या रिक्षा भाड्याने देत असे. यातून तो दिवसाला दोन ते अडीच हजार कमावत असे. या आरोपीने मुंबई सोबतच ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई भागातील रिक्षा चोरी करून त्याला भाड्याने देण्याचा उपक्रम चालू केला होता. परंतु अंधेरी पोलिसांकडून या गुन्हेगारास पकडण्यात यश आले आहे.
हा तपास पोलीस उपायुक्त मंडळ 10 मुंबई डॉक्टर महेश्वर रेड्डी सहायक पोलीस आयुक्त विभाग मुंबई, दिनेश देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंधेरी पोलीस ठाणे, विजय बडगे यांनी केला.
हेही वाचा- कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश