ETV Bharat / city

Corona update - कोरोनाचे ८ महिन्यांत ४ लाख २५ हजार रुग्ण, तर ४, ८२७ जणांचा मृत्यू - मुंबईतीली कोरोना रुग्णाची संख्या

राज्यात यावर्षी १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ या ८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या ४ लाख २५ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली असून, ४ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कोरोना रुग्णांचा मृत्यू दर १.१३ एवढा नोंदवला गेला आहे.

Corona update
कोरोना रुग्णांची माहिती
author img

By

Published : Sep 7, 2021, 2:57 AM IST

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. यावर्षी १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ या ८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या ४ लाख २५ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली असून, ४ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कोरोना रुग्णांचा मृत्यू दर १.१३ एवढा नोंदवला गेला आहे.

७ लाख रुग्ण, १५,९९८ मृत्यू -

मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आता (६ सप्टेंबर) पर्यंत ७ लाख ४६ हजार ७२५ एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख २४ हजार ४९४ रुग्ण बरे झाले असून, १५ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मार्च २०२० पासून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कोरोनाच्या ७ लाख ४४ हजार १५५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५ हजार ९७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक रुग्ण, मृत्यू एप्रिलमध्ये -

१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ या ८ महिन्यांच्या कालावधीत ४ लाख २५ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली असून, ४ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत सर्वाधिक २ लाख १४ हजार ९८५ रुग्ण हे एप्रिल महिन्यात, तर सर्वात कमी म्हणजे ७ हजार ९६४ रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. तसेच, सर्वाधिक १ हजार ९३४ मृत्यू हे एप्रिल महिन्यात झाले असून, सर्वात कमी १०५ मृत्यू हे ऑगस्ट महिन्यात झाले आहेत.

महिन्याला ६०० मृत्यू -

कोरोनाच्या रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीवरून दर महिन्याला सरासरी ५३ हजार १४२ तर, दररोज सरासरी १ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, दर महिन्याला कोरोनामुळे सरासरी ६०३ मृत्यू झाले आहेत. तसेच, दररोज २० मृत्यू झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.