मुंबई - कोरोनाव्हायरस साथीच्या नंतर मुंबई शहरातील प्रमुख कर्करोग संस्थेत 30 टक्के अधिक रुग्णांची नोंद झाली आहे (Post pandemic 30 percent more cancer patients). त्यापैकी बरेच रुग्ण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या (Tata Memorial Centre) एका उच्च अधिकार्याने ही माहिती दिली.
जास्त 30 टक्के रुग्णांवर उपचार - टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) मधील डॉक्टरांनी सांगितले की, हॉस्पिटलला भेट देण्याची भीती हे कारण अजूनही कमी लोक उपचारासाठी येण्यामध्ये असू शकते. TMC संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, संस्थेने कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान त्यांच्या नियमित क्षमतेच्या 60 टक्के रुग्णांवर उपचार केले. कोविड-19 प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली. त्यामुळे रुग्ण पुन्हा उपचारासाठी परत येत आहेत. आम्ही जास्त 30 टक्के रुग्णांवर उपचार करत आहोत. याचा अर्थ असा की 30 टक्के रुग्णांवर साथीच्या आजारादरम्यान उपचार झाले नाहीत. ते आता परत उपचारासाठी येत आहेत. त्यापैकी काही प्राथमिक अवस्थेत आहेत. परंतु त्यापैकी बरेच रुग्ण पुढील स्टेजमधील असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले.
कोरोनामुळे इतर आरोग्य सेवांना फटका - डॉ. बडवे म्हणाले की कर्करोगाच्या वाढीची तीव्रता समजून घेण्यासाठी रुग्णालय अशा प्रकरणांचे दस्तऐवजीकरण करत आहे. दोन-तीन महिने प्रतीक्षा केल्याने काही फरक पडणार नाही. मात्र एक-दोन वर्षांनी फरक पडेल असे डॉ. बडवे म्हणाले. महामारीच्या काळात, कोरोनाव्हायरसशी संबंधित सेवांव्यतिरिक्त इतर आरोग्य सेवांना फटका बसला. कारण रूग्णांच्या वाढीमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर जास्त भार आला होता. टीएमसीला दरवर्षी 80,000 नवीन रुग्ण येतात आणि 5 लाख 50,000 रुग्ण त्यानंतर नियमित उपचारासाठी पुन्हा येतात. टाटा मेमोरियल सेंटरच्या माध्यमातून मुंबईतील प्रीमियर टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह नऊ कर्करोग रुग्णालये चालवण्यात येतात. त्यातून एकत्रित मिळालेल्या माहितीवरुन ही आकडेवारी मिळालेली आहे. त्यामुळे यापुढे कदाचित या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.