मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राज्यातील एकूण मतदान केंद्राचे साधारण, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असे वर्गीकरण केले जाते. मतदान केंद्राच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर केली जातात. त्याचप्रमाणे आयोगाचे निकष, पोलिसांचा अहवाल इत्यादी बाबींचा विचार केला जातो. काही वेळा एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्रे असतात अशा ठिकाणी होणारी मतदारांची गर्दी लक्षात घेऊनही तेथील मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली जातात. राज्यात सोमवारी २१ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी एकूण २७६२ मतदानकेंद्रांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाची प्रतिक्षा
राज्यात संवेदनशील मतदान केंद्रे
मुंबई शहर जिल्ह्यात ३२५ मतदान केंद्रे तर पुणे जिल्ह्य़ात २५२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. अमरावती जिल्ह्यात २१७ केंद्रे, गोंदियात १२६, औरंगाबादमध्ये १००, नाशिक ९६, वाशीमध्ये ८५ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
सोलापूर जिलह्यात ८७ मतदान केंद्रे, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यातत ५० ते ५५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
हेही वाचा... 'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 591 मतदान केंद्र संवेदनशील
ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहे. जिल्ह्यात 6 हजार 621 मतदान केंद्रे असून मुख्य मतदान केंद्र 6 हजार 488 आहेत. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात 591 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत.
संवेदनशील मतदान केंद्रावरवर पोलिसांची असणार नजर
राज्यातील या सर्व मतदान केंद्रावर पोलीस, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा रक्षक दलांची करडी नजर असणार आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही ठिकाणी लाईव्ह वेबकास्ट करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणच्या मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. विशेष म्हणजे नक्षलप्रभावीत गडचिरोलीसह वर्धा, बुलढाणा, अहमदनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही.
9673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट
राज्यात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये सर्व संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट
राज्यात 288 आदर्श मतदान केंद्र
विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर 15 प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विशेष काळजी घेण्यात येईल. वृध्द नागरिकांसाठी रॅम्प, मतदारांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह,विद्युत पुरवठा या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा... EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?
मतदाराची ओळख पटविण्यासाठी 11 विविध पर्याय
निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी आयोगाने अकरा पर्याय दिले आहेत. सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आधार कार्डासह अकरा कागदपत्रांच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारी अथवा सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.