ETV Bharat / city

Kabbadi Player Killed In Dharavi : धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या; तिघांना अटक - कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या तिघांना अटक

धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची हत्या करण्यात आली ( 26 Year Old Kabaddi Player Bludgeoned to Death ) आहे. डोक्यात स्टंप घालून ही निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Kabbadi Player Killed In Dharavi
Kabbadi Player Killed In Dharavi
author img

By

Published : Jul 24, 2022, 3:54 PM IST

मुंबई - धारावीतील कामराज नगर येथील 26 वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी ( 22 जुलै ) सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात ( 26 Year Old Kabaddi Player Bludgeoned to Death ) आली. विमलराज नाडर असे या खेळाडूचे नाव आहे. डोक्यात स्ंटप घालून विमलराजची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मल्लेश चितकंडी (32) आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे. धारावी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई वडील व भावंडे असा परिवार आहे.

  • Mumbai | Crowd gathers outside Dharavi PS as protestors continue demanding the arrest of all accused in the murder case of a 26-year-old kabbadi player. Three accused have yet been arrested in the case. pic.twitter.com/EfoomqRUHo

    — ANI (@ANI) July 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

झोपेत व्यत्यय आणला म्हणून वाद - धारावीच्या 90 फिट रोडवर कामराज चाळीमध्ये राहणाऱ्या विमलराजने कबड्डीच्या खेळातून विभागात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मल्लेश चिताकांडी हा आरोपी विमलराजच्या शेजारीच राहत होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास मल्लेश आणि त्याचा मित्र विमल राजच्या घराबाहेर मोठ्या आवाजात बोलत होते. ते विमलराज झोपेत व्यत्यय आणत होते. त्यावरुन वादाला सुरुवात झाली.

...अन् विमलराज तिथेच पडून होता - काही मिनिटांनी मालेश चिताकांडी पुन्हा तिथे आला. त्याच्या हातात स्टंप होता. त्याने थेट विमल राज नाडारच्या डोक्यात तो स्टंप घातला. तेव्हा विमलराज जागीच कोसळला. त्यानंतर मल्लेश तिथून निघून गेला. विमलराज तिथे 5 वाजेपर्यंत पडून होता. स्थानिकांनी त्याला पाहिल्यानंतर जवळच्या सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मल्लेश चितकंडी आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे.

हेही वाचा - Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.