ETV Bharat / city

Central Railway Mega block : प्रवाशांना लक्ष द्या! मध्य रेल्वेने रविवारी घेतला 24 तासांचा मेगाब्लाॅक; या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द!

author img

By

Published : Dec 30, 2021, 12:39 PM IST

मध्य रेल्वेकडून रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक ( Central Railway mega block on Sunday ) घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी मध्यरात्री दोनपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. ठाणे-दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.

Central Railway Mega block
मध्य रेल्वेचा ठाणे-दिवा मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई - ठाणे आणि दिवा पाचव्या - सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळाना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यानच्या मध्य रेल्वेने तब्बल 24 तासांचा जम्बो ब्लॉक ( Central Railway mega block on Sunday ) घेण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री 2 ते सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत 150 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून 20 पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

असा असणार मेगाब्लॉक -

या ब्लॉक कालावधीत शनिवारी मध्यरात्री 11.52 वाजल्यापासून ते रविवारी 11.52 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि गंतव्य स्थानकावर निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या / अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून रविवारी पहाटे 05.05 वाजलेपासून ते सोमवारी दुपारी 1.15 वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यागाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानकावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाही-

ब्लॉककाळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था देखील केली आहे. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या /टर्मिनेट होणारे लोकल सेवा उपलब्ध नसतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.

शनिवारी रद्द झालेल्या मेल/एक्सप्रेस गाड्या-

12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस
12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

रविवारी रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या-

11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
12071 / 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
12109 /12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
12123 /12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
11139 मुंबई-गदग एक्सप्रेस
17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

सोमवारी रद्द होणाऱ्या एक्सप्रेस गाड्या-

11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
11140 गदग-मुंबई एक्सप्रेस

या मेल एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट-

पाचव्या सहाव्या मार्गिकेचा कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे काही मेल- एक्स्प्रेस गाडया शॉर्ट टर्मिनेट केलेल्या आहेत. ज्यामध्ये
1 जानेवारी 2022 रोजी सुटणारी 17317 हुबली-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि 2 जानेवारी 2022 सुटणारी 17318 दादर-हुबली एक्सप्रेस दादर ऐवजी पुण्याहून निघेल. 1 जानेवारी 2022 रोजी सुटणारी 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि 2 जानेवारी 2022 सुटणारी 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबई ऐवजी पुणेहून सुटणार आहे.

हेही वाचा - Kalicharan Maharaj Arrested : महात्मा गांधींबद्दल प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कालीचरण महाराजाला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.