ETV Bharat / city

Lumpy Skin Disease : लम्पीचे राज्यात तांडव सुरूच; १८७ जनावरे दगावली, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

देशभरातील पशुधनाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत चाललेल्या लम्पी चर्मरोगाने राज्यातही थैमान (Lumpy Skin Disease rampage continues in state) घातले आहे. राज्यसरकारने केलेल्या विविध उपाययोजना करूनही राज्यात लम्पी रोगामुळे आतापर्यत १८७ जनावरांचा मृत्यू (187 animals were burnt) झाला आहे. २५ जिल्ह्यांमधील ९६३ गावांमधील ७,३५६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (huge loss to farmers) झाले आहे.

Lumpy Skin Disease
लम्पीचे राज्यात तांडव सुरूच
author img

By

Published : Sep 19, 2022, 6:50 PM IST

मुंबई - देशभरातील पशुधनाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत चाललेल्या लम्पी चर्मरोगाने राज्यातही थैमान (Lumpy Skin Disease rampage continues in state) घातले आहे. राज्यसरकारने केलेल्या विविध उपाययोजना करूनही राज्यात लम्पी रोगामुळे आतापर्यत १८७ जनावरांचा मृत्यू (187 animals were burnt) झाला आहे. २५ जिल्ह्यांमधील ९६३ गावांमधील ७,३५६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (huge loss to farmers) झाले आहे.

२५ जिल्ह्यांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव : राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वात आधी जळगावमध्ये लम्पीची लागण जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा २५ जिल्ह्यांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. राज्यात लम्पीचा प्रसार होऊ नये, यासाठी शासनाने गावगावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्याच्या सुरवातीला ६४ इतके जनावरांच्या मृत्यूदर असणारे प्रमाण वाढून ते या आठवड्याच्या सुरवातीला १८७ इतके झाले आहे. परंतु, लसीकरण मोहीमेमुळे २७३० इतके पशुधन बरे झाले, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्याला ५० लाख लसमात्रा प्राप्त होणार : पशुसंवर्धन आयुक्त यांनी या आठवड्यात राज्याला ५० लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. गोशाळा, मोठे गाठे आणि जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण आणि लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्यात ४८ लाख ९३ हजार २०० इतक्या लस उपलब्ध अजूनही, २९ लाख पशुधनाचे लसीकरण करणे बाकी असल्याचे स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान : लम्पी आजारामुळे जनावरे दगावत असल्याचा, शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आजारावरील नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निधीमधून जनावरांचे औषधोपचार, सिरिंज, निडल, पीपीई किट, बाधित क्षेत्रातील गुरांच्या गोठ्यात औषध फवारणी. उपकरणे आणि इतर आवश्यक उपाय योजना यावर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

कोणत्या जिल्हयात किती पशुधनाची हानी : राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ६४ जनावरे दगावली आहेत. त्या पाठोपाठ अकोला जिल्ह्यात 28 आणि नगर जिल्ह्यात - २४ जनावरे दगावली आहेत. धुळे - ७ ,पुणे - १७, लातूर - ३, सातारा - ९ ,बुलडाणा - १०, अमरावती - १३, कोल्हापूर, ठाणे, सांगली, वाशिम, नागपूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एक पशुधन मृत्युमुखी पडले आहे. राज्यात एकूण आतापर्यंत 187 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.