मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी 14 ऑक्टोबरला 2 हजार 384 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 35 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 343 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
29,560 सक्रिय रुग्ण -
गुरूवारी राज्यात 2384 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 86 हजार 280 वर पोहचला आहे. तर आज 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 705 वर पोहचला आहे. आज 2 हजार 343 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 13 हजार 418 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 6 लाख 83 हजार 524 नमुन्यांपैकी 65 लाख 86 हजार 280 नमुने म्हणजेच 10.85 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 26 हजार 249 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 29 हजार 560 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
1 ऑक्टोबरला 3105, 2 ऑक्टोबरला 2696, 3 ऑक्टोबरला 2692, 4 ऑक्टोबरला 2026, 5 ऑक्टोबरला 2401, 6 ऑक्टोबरला 2876, 7 ऑक्टोबरला 2681, 8 ऑक्टोबरला 2620, 9 ऑक्टोबरला 2486, 10 ऑक्टोबरला 2294, 11 ऑक्टोबरला 1736, 12 ऑक्टोबरला 2069, 13 ऑक्टोबरला 2219, 14 ऑक्टोबरला 2384 रुग्ण आढळून आले आहेत.
1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 9 ऑक्टोबरला 44, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई महापालिका - 558
- अहमदनगर - 290
- पुणे - 302
- पुणे पालिका - 110
- पिंपरी चिंचवड पालिका - 98
- सोलापूर- 99
- सातारा - 80
हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी