ETV Bharat / city

Andheri by Election: अंधेरी पोटनिवडणूक! तब्बल 14 उमेदवार रिंगणात

Andheri by Election: अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे 9 उमेदवार रिंगणात असल्याने आता लढतीची चुरस अधिक असणार आहे.

author img

By

Published : Oct 15, 2022, 9:14 PM IST

Andheri by Election
Andheri by Election

मुंबई: अंधेरी पूर्व येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत, असे असले तरी मुख्य लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यामध्येच होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या Maharashtra Legislative Assembly अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, १७ ऑक्टोबर २०२२ असणार आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी), राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी- पीपल्स), मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी), चंदन चतुर्वेदी (अपक्ष), चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष), निकोलस अल्मेडा (अपक्ष), नीना खेडेकर (अपक्ष), पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष), शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष)

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई Andheri by Election उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

जिल्हाधिकारी यांचे मतदारांना आवाहन दरम्यान, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या Andheri by Election या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.