ETV Bharat / city

Mumbai Terrorist attack : 26/11 हल्ल्याला 13 पूर्ण; हल्यात 197 निष्पाप नागरिकांचा झाला होता मृत्यू - 26/11 हल्ला

26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यावेळेस 13 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ले केले होते.

Mumbai Terrorist attack
Mumbai Terrorist attack
author img

By

Published : Nov 26, 2021, 6:05 AM IST

Updated : Nov 26, 2021, 9:46 AM IST

मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यावेळेस 13 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकीं 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडत त्याला फासावर लटकवले.

  • या 10 ठिकाणी झाले हल्ले

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ले केले होते. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या गल्लीत देखील हा हल्ला घडवण्यात आला होता. याबरोबरच विलेपार्ले परिसरात एका टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.26 नोव्हेंबरच्या दिवशी रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झालेले 10 दहशतवादी हे वेगवेगळ्या गटात विखुरले होते. यात दोघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा व खाण्यापिण्याचे सामान होते. मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरीमन हाऊस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, विलेपार्ले अशा ठिकाणी गेलेल्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावली होती. यामध्ये मुंबई पोलिसांच्या 18 जवानांना वीरमरण आले होते. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 400 लष्कर कमांडो, 300 एनएसजी कमांडो तसेच 100 मार्कोस कमांडो हे घटनास्थळी पाठवण्यात आले होते.

  • या देशातील नागरिकांचा झाला मृत्यू

दहशतवादी हल्ल्यात तब्बल 178 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात अमेरिकेच्या 4 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात ऑस्ट्रेलियाचे 4, कॅनडा देशातील 3 नागरिक, जर्मनीचे 3 नागरिक, इस्त्राईलच्या 2 नागरिकांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच फ्रान्सच्या 2, ब्रिटन, सायप्रस, इटली, जपान, मॉरिशस, मेक्सिको, सिंगापूर, थायलंड, नेदरलँडच्या प्रत्येकी एका नागरिकांचा या हल्ल्यात मारला होता.

  • वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई

देशाचे आर्थिक शहर असल्यामुळे मुंबई शहरामध्ये नेहमी सतर्कता बाळगली जाते. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संचारबंदी जाहीर केली जाते. काही विशिष्ट ठिकाणी यात खास करून बीएआरसी, एचपी रिफायनरी, बीपी रिफायनरी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंत्रालय व इतर संवेदनशील परिसरामध्ये ड्रोनसारख्या गोष्टींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

  • हे प्रमुख पोलीस अधिकारी दहशतवाद्यांशी लढताना झाले शहीद-

दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर, एन. एस. जी कमांडो अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन हे प्रमुख अधिकाऱयांना वीरमरण आले.

हेही वाचा - 26/11 Attack : 13 वर्षांनंतरही अंगावर येतो काटा....वाचा 26/11 हल्यातील साक्षीदार देविका रोटवानीची खास मुलाखत

Last Updated : Nov 26, 2021, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.