ETV Bharat / city

Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आणखी 10 जणांना अटक

author img

By

Published : Apr 11, 2022, 11:56 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Silver Oak Attack Case ) यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी दहा ( 10 more arrested sharad pawar house attack case ) जणांना मुंबई पोलिसांनी आज अटक केली. यापूर्वी १०९ कर्मचारी आणि कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

10 more arrested sharad pawar house attack case
शरद पवार घर हल्ला 10 जण अटक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Silver Oak Attack Case ) यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी दहा ( 10 more arrested sharad pawar house attack case ) जणांना मुंबई पोलिसांनी आज अटक केली. यापूर्वी १०९ कर्मचारी आणि कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Vs Somaiya : सोमय्या पिता-पुत्र दोन ठग कुठे पळून गेले? -संजय राऊत

पाच महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मागणीवर अडून असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक देत गोंधळ घातला. पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानक आलेला जमावामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांची धरपकड केली. तसेच, कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. शनिवारी त्यांना किल्ला कोर्टात हजर केले. दरम्यान, झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सदावर्ते यांच्यासहित १०९ कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी सुनावली.

आज आणखी दहा कर्मचाऱ्यांना हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी घराची रेकी करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. या सर्व प्रकरणाच्या तपासाकरिता पथक नेमण्यात आले आहे. या पथकाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. आज दहा जणांना अटक केली असून, उर्वरित सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे, आरोपींच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Role of Transport Minister : एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.