ETV Bharat / city

Dahi Handi Festival Kolhapur युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार, तयारी पूर्ण - युवाशक्ती दहीहंडी सोहळा कोल्हापूर

गेली ३ वर्षे युवाशक्ती दहीहंडीचे Yuvashakti Dahi Handi Kolhapur आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोरोना संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने Dahi Handi Festival Kolhapur दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदानात ही भव्य स्पर्धा रंगणार आहे.

कोल्हापूर दहीहंडी
कोल्हापूर दहीहंडी
author img

By

Published : Aug 18, 2022, 6:38 PM IST

कोल्हापूर - महापूर आणि कोरोनामुळे सलग तीन वर्षांपासून ज्या युवाशक्ती दहीहंडी सोहळ्याला कोल्हापूरकर मुकले तेच आता उद्या दहीहंडीचा थरार अनुभवणार आहेत. महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ वर्षे युवाशक्ती दहीहंडीचे Yuvashakti Dahi Handi Kolhapur आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोरोना संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने Dahi Handi Festival Kolhapur दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदानात ही भव्य स्पर्धा रंगणार आहे. तीन लाख रुपयांचे बक्षीस असलेली ही मोठी दहीहंडी असणार आहे.

असा सुरू झाला कोल्हापुरात दहीहंडी थरार : खासदार धनंजय महाडीक यांच्या संकल्पनेतून 2007 साली या युवशक्तीच्या दहीहंडीचा थरार सुरू झाला. बघता बघता संपूर्ण जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी याची ओळख निर्माण झाली. त्यामुळे जिल्ह्यासह अनेक भागातून दहीहंडी पथके यामध्ये सहभाग घेऊ लागली. प्रत्येक वर्षी दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम तर वाढवलीच शिवाय अनेकांना प्रोत्साहनपर बक्षिसांची सुद्धा घोषणा करण्यात आली. महिलांच्या पथकांना सुद्धा दरवर्षी प्रोत्साहन पर बक्षिणे दिली जातात. सहभागी होणाऱ्या प्रत्येक दहीहंडी पथकाला 25 हजारांचे बक्षीस दिले जाते. पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाते.

स्पर्धास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना : या स्पर्धेसाठी तब्बल 3 लाखांचे बक्षीस घोषित केले आहे. यामध्ये सर्वात वरती जाऊन दहीहंडी फोडणारा गोविंदा हा 14 वर्षांवरील असावा अशी नियमावली सुद्धा बनविण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सुद्धा योग्य उपाययोजना करण्यात आली असून कोणत्याही पद्धतीने अपघात घडू नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे एक पथकही सज्ज असते.

2019 मध्ये महापूर, त्यानंतर कोरोनामुळे दहीहंडी रद्द : कोल्हापूरात हजारोंच्या संख्येने युवाशक्तीच्या दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी दसरा चौक येथे येत असतात. मात्र 2019 साली कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे संकट आले. यामध्ये हा सोहळा धुमधडाक्यात साजरा करणे योग्य नसल्याचे म्हणत धनंजय महाडिक यांनी तेंव्हाची स्पर्धा रद्द करून या स्पर्धेवर जेव्हढा खर्च होतो त्याच्या काही पट अधिक रक्कमेची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली. महापुरानंतर लगेचच सलग दोन वर्षे कोरोनामुळे पुन्हा दहीहंडी स्पर्धा रद्द झाली. मात्र या दोन्ही वर्षी स्पर्धेची रक्कम रुग्णसेवेसाठी आणि इतर मदतीसाठी देण्यात आली. मात्र आता यावर्षी पुन्हा एकदा मोठा दहीहंडी थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे.

हेही वाचा - Dahi Handi festival भाजपकडून मुंबई महापालिका टार्गेट, तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडीचे केले आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.