ETV Bharat / city

Rane Criticizes Raut : 'हे लावालावी करायचं काम बंद करा अन..' नारायण राणेंचा संजय राऊत यांच्यावर घणाघात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (Narayan Rane on Sanjay Raut) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावं असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

-narayan-rane-criticizes-shiv-sena-mp-sanjay-raut
नारायण राणेंचा संजय राऊत यांच्यावर घणाघात
author img

By

Published : Dec 12, 2021, 5:17 PM IST

कोल्हापूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane on Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांनी आगी लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावं, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

एका कार्यक्रमानिमित्त नारायण राणे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आता भाजपमध्ये नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, मी भाजपमध्ये आहे. कोण कोणापेक्षा लहान आहे याच मूल्यमापन मी करणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

नारायण राणेंचा संजय राऊत यांच्यावर घणाघात

राणे म्हणाले की, आगी लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. (Rane Criticizes Raut)नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. सध्या राज्यांमध्ये पेपर फुटी प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राणेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर दुसरं काय होणार असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तर राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षांनी मागे गेले आहे. म्हाडा पेपर फुटी वर तसेच राज्यातील एकूणच पेपरफुटीच्या प्रकरणावर ती भ्रष्टाचार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार?

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच नाही. शेतकऱ्यांचे मजुरांचे विद्यार्थ्यांचे विकास कुठेच चालू नाहीय. विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुखच नसेल (Narayan rane criticizes uddhav Thackeray) तर यंत्रणेवर कोणाचा अंकुश असणार असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थिती केला आहे. तर राज्याची परिस्थिती सध्या कठीण आहे. महविकास. आघाडीमुळे राज्य 10 वर्षे मागे गेले आहे. सरकारवर कोणाचा अंकुश राहिला नाहीय. यामुळे पैसे देऊन पेपरफुटत आहेत. यामुळे भ्रष्टाचार देखील वाढला आहे, असे देखील नारायण राणे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.