कोल्हापूर - दिवसेंदिवस कोल्हापुरातील रुग्णांची संख्या वाढतच निघाली आहे. सोमवारी सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंतच्या आलेल्या आकेवारीनुसार जिल्ह्यात 37 नवीन रुग्णांची वाढ आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 378 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 12 दिवसांपासून कोल्हापुरातील रुग्णांची संख्या सातत्त्याने वाढत चालली आहे. यामध्ये शाहुवाडीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे. आजरा तालुक्यात सुद्धा आज 16 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे :
आजरा : 16
भुदरगड : 2
पन्हाळा : 3
राधानगरी : 1
शाहूवाडी : 15