कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेल्या 24 तासात तर कोल्हापुरात उच्चांकी 53 जणांचा मृत्यू झाला असून 1553 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 1018 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा 10 हजार 274 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 381 इतकी झाली आहे.
हेह वाचा - कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 381 वर पोहोचली आहे. त्यातील 60 हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 274 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 460 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 102 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2621 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 5255 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 40438 रुग्ण
51 ते 70 वर्ष -19962 रुग्ण
71 वर्षांवरील - 5002 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 73 हजार 381 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 16
2) भुदरगड - 61
3) चंदगड - 24
4) गडहिंग्लज - 18
5) गगनबावडा - 1
6) हातकणंगले - 94
7) कागल - 64
8) करवीर - 161
9) पन्हाळा - 76
10) राधानगरी - 20
11) शाहूवाडी - 23
12) शिरोळ - 308
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 186
14) कोल्हापुर महानगरपालिका - 360
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 140
हेही वाचा - कोरोना संक्रमणात औषधांच्या मदतीच्या नावावर होते प्रचंड लूट, व्हा सावध