कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी असे सेनेकडून सांगण्यात आले होते मात्र आपण कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही. सर्वजण छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असे संभाजीराजे यांनी म्हंटले होते. शिवाय आपले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली असून सर्वकाही ठरले आहे असेही ते म्हणाले होते. मात्र शिवसेनेने आपल्या भूमिकेवर ठाम राहत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेसाठी दिलेल्या या उमेदवारीनंतर अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कोण आहेत संजय पवार जवर एक नजर..
तीन वेळा नगरसेवक ते थेट राज्यसभेची उमेदवारी; शिवसेनेचे नेते संजय पवार यांची झंझावाती कारकीर्द - Sanjay Pawar profile
संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. शिवसेना म्हटले की संजय पवार हा चेहरा नेहमीच समोर येत असतो. याच संजय पवारांनी 1989 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक आंदोलने मोर्चे यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला. पुढे त्यांनी आपल्या कामातून स्वतःचे एक वेगळं नाव जिल्हाभर केले.