ETV Bharat / city

मंदिरे सुरु : भाजपाच्या वतीने ढोल ताशे वाजवत महाद्वार चौक येथे आनंदोत्सव

राज्य सरकारने आजपासून महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली महाद्वार चौक येथे ढोल ताशांचा गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

author img

By

Published : Nov 16, 2020, 7:28 PM IST

Temples started
मंदिरे सुरु

कोल्हापूर - कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे गेली ८ महिने बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरे, प्रार्थनास्थळे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य सरकारने आजपासून महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली महाद्वार चौक येथे ढोल ताशांचा गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी अंबा माता की जय, उदं ग आई उदं, जोतिबाच्या नावानं चांगभलं, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या.

ठाकरे सरकारला उशिरा का होईना सुबुद्धी दिली -

राज्यात कोरोनाचा संसर्क कमी होत चालला असताना राज्यातील मद्यालये यापूर्वीच सुरु झाली होती परंतु देवालये बंद ठेवण्यात आली होती. मंदिरे सुरु होण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली होती. असे असताना देखील या ठाकरे सरकारला जाग येत नव्हती. आई अंबाबाईने या ठाकरे सरकारला उशिरा का होईना सुबुद्धी दिली असे भाजपाचे सरचिटणीस विजय जाधव यांनी म्हटले.

हेही वाचा -मनमाडमधील सर्व धार्मिक स्थळे उघडली, धर्मगुरुंनी मानले सरकारचे आभार

चांगल्या विचारांचे, भाजपचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत यावे -

गेली ८ महिने महाराष्ट्रातील ही मंदिरे बंद होतीत. ही मंदिरे उघडावीत म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने वारंवार अनेक आंदोलने केली. राज्यात एकीकडे दारूची दुकाने सुरु झाली, मॉल उघडलले, बार उघडले पण सर्व धर्मांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे यापूर्वीच सुरु करायला पाहिजे होती कारण त्याठिकाणी सोशल डीस्टनसिंगचे भान पाळण्याची शक्यता जास्त होती. पण उद्धव ठाकरे सरकारनी फक्त भारतीय जनता पार्टी मंदिरे उघडा म्हणत आहे म्हणून मंदिरे उघडली नाहीत असे आमचे मत आहे. या सरकारला मंदिरांच्या बाबतीत एवढी उदासीनता का हा येणारा काळ ठरवेल. आज वेळानं का होईना मंदिरे सुरु झाली त्यामुळे आई अंबाबाई या सरकारला जनतेची काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. मद्यालये लवकर उघडली पण मंदिरे उघडली नाही हे सरकारचे अपयश म्हणावे लागेल असे भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी म्हंटले. तसेच चांगल्या विचारांचे, कामाचे भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत यावे अशी प्रार्थना उपस्थित सर्वांच्या वतीने देवीकडे करण्यात आली असल्याचेही चिकोडे यांनी म्हंटले.

हेही वाचा -उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.