ETV Bharat / city

Kolhapur North by - election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी शेतकरी संघटनेकडून 'हा' उमेदवार जाहीर - शेतकरी संघटना उमेदवार राजेश नाईक

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पोटनिवडणुकीत रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनेही उडी घेतली असून, शेतकरी संघटनेकडून उद्योजक राजेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी केली.

shetkari sanghatna candidate Kolhapur
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक
author img

By

Published : Mar 16, 2022, 9:22 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पोटनिवडणुकीत रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनेही उडी घेतली असून, शेतकरी संघटनेकडून उद्योजक राजेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी केली. नाईक यांना उमेदवारी दिली असल्याचे अधिकृत पत्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिले असल्याचे शिंदे यांनी म्हटले. तसेच, कोल्हापूरची ही पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया देताना उमेदवार राजेश नाईक

हेही वाचा - Kolhapur To Tirupati Daily Flight : आनंदाची बातमी.. 27 मार्चपासून सातही दिवस कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा

उद्योजक राजेश नाईक यांना उमेदवारी

दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेवर पोट निवडणूक लागली असून, 12 एप्रिलला निवडणुका होणार आहेत. यामुळे प्रशासन कामाला लागले असून, दुसरीकडे राजकीय पक्ष देखील इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेत आहेत. या निवडणुकीत आता रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनेही आपला उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरातील उद्योजक राजेश नाईक यांना शेतकरी संघटनेने उमेदवारी देत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजेश नाईक हे कटिबद्ध असून, कोल्हापुरातील पुरातन मालमत्ता संरक्षण यासह उद्योजकांना येत असलेल्या अडचणी यासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राजेश नाईक यांनी सांगितले.

..अशी आहे कोल्हापूर उत्तर मतदारांची आकडेवारी

उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 583 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 656 हे पुरुष मतदार, तर 1 लाख 45 हजार 915 स्त्री मतदार आहेत. तसेच, 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 11 हजार 275 मतदार आहेत. तर, सैन्य दलातील मतदाराची संख्या ही 95 इतकी आहे. तसेच, ज्या उमेदवारांच्या प्रचार सभा आणि रॅलीमध्ये एक हजारपेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार असतील अशांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

हेही वाचा - Self-Immolation Attempt Kolhapur : महावितरण कार्यालयातच शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.