ETV Bharat / city

Kolhapur Dasara: कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात शासनाचाही सहभाग; यंदा 2 दिवस तर पुढच्या वर्षीपासून 3 दिवस सोहळा - shahi dussehra of kolhapur

Deepak Kesarkar on kolhapur Dasara: कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रिय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांची परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर Kolhapur Guardian Minister Deepak Kesarkar यांनी दिली.

Deepak Kesarkar on kolhapur Dasara
Deepak Kesarkar on kolhapur Dasara
author img

By

Published : Oct 2, 2022, 3:34 PM IST

Updated : Oct 2, 2022, 4:22 PM IST

कोल्हापूर: कोल्हापूरच्या शाही दसरा shahi dussehra of kolhapur सोहळ्यात यावर्षी शासनाचाही सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे यंदा 2 दिवस दसरा सोहळा होणार आहे, तर पुढच्या वर्षीपासू 3 दिवस हा शाही दसरा सोहळा होणार आहे. यामध्ये न्यु पॅलेस ते दसरा चौक पर्यंत विविध प्रदर्शनही भरवले जाणार असून शाहू महाराजांच्या पुतळ्यावर आणि आई अंबाबाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू आहे.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात शासनाचाही सहभाग

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक यासाठी शासनाकडून 25 लाखांचा निधी दिला जाणार आहे. अशी नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे. आज स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी न्यु पॅलेसमध्ये जाऊन श्रीमंत शाहू महाराज आणि छत्रपती घराण्यातील सदस्यांची भेट घेत माहिती घेतली. शिवाय दसरा महोत्सवाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही Meeting at Collector Office घेण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

शाही दसरा सोहळा जगभरात पोहोचवूया केसरकर यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया. या महोत्सवासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी कमी कालावधी असला तरी देखील विविध उपक्रमांची व्यापक प्रसिध्दी व सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शाही दसरा महोत्सव हे देशातील एक आकर्षण ठरुन देश विदेशातील नागरिकांनी या शाही दसरा महोत्सवाला भेट द्यावी, अशा पध्दतीने हा महोत्सव साजरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुया.

दीपक केसरकरांची घोषणा या महोत्सवात अधिकाधिक नागरिक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी न्यू पॅलेस ते दसरा चौक व भवानी मंडप ते दसरा चौक मार्गांवर कार्यक्रम आयोजित करावेत. या मार्गांचे सुशोभिकरण, विविध पारंपरिक कला व क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करावे, असेही त्यांनी म्हंटले आहे. यावेळी दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सविस्तर चर्चा केली आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.