ETV Bharat / city

Kolhapur Year Ender 2021 : गोकुळमधील सत्तांतर ते एसटी कर्मचारी आंदोलन, वाचा 2021 मधील कोल्हापूरातील महत्वाच्या घडामोडी - kolhapur ST Worker Agitation

2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी कोल्हापूर जिल्ह्या चर्चेत राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर कोल्हापूर जिल्ह्यातील ( kolhapur District year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाच्या घटनांचा ( Important events In Year 2021 In Kolhapur District ) 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.

Kolhapur Year Ender 2021
कोल्हापूर जिल्हा
author img

By

Published : Dec 25, 2021, 7:44 PM IST

Updated : Dec 28, 2021, 9:41 AM IST

कोल्हापूर - 2021 या सालात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ( kolhapur District year Ender 2021 ) महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजकारणासह, सहकार, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, गुन्हेगारी, कृषी आदी क्षेत्रात प्रामुख्याने अनेक घटना घडल्या ( Important events In Year 2021 In Kolhapur District ) आहेत. याच क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडीचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.

  1. महापूर 2021 : 2019 साली जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक मोठा महापूर ( 2021 kolhapur mahapur ) आला होता. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्याहुनही अधिक मोठा महापूर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवला. 2019 च्या महापुराच्या आठवणी ताज्या असतानाच जिल्ह्यात पुन्हा महापूर आला. 2019 पेक्षाही मोठा पूर 2021 मध्ये आला. यामध्ये सुद्धा अनेकांची घर जमीनदोस्त झाली, व्यवसाय बुडाले जनावरे दगावली. यावर्षी सुद्धा कोट्यवधींचे नुकसान झाले. महापुराचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला. एकूण 58 हजार 997 हेक्टर इतके क्षेत्र यामुळे बाधित झाले. जिल्ह्यात 71 हजार 289 इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या होती.
  2. गोकुळ मध्ये सत्तांतर; आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोडी यावर्षी घडली. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोकुळ दूध संस्थेवर ( kolhapur gokul election ) महाडिक, पी.एन. पाटील आणि नरके गटाची सत्ता होती. त्याच गोकुळच्या सत्तेवर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ताबा मिळवला. यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी एकत्र राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी निर्माण करून 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली. खरंतर, एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचे संचालक करा असे म्हंटले जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणातील ही सर्वात महत्वाची राजकिय घडामोडी ठरली. त्याचबरोबर राजकारणातील सर्वात महत्वाचा घटनांमध्ये यावर्षी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे येथील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे ( mla chandrakant jadhav death ) आकस्मिक निधन झाले. 2 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे हैद्राबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
  3. बिनविरोध झालेली विधानपरिषद निवडणूक : कोल्हापूरच्या राजकारणातील दुसरी महत्त्वाची आणि सर्वांसाठीच आश्चर्यकारक अशी घटना यावेळी पाहायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरात महाडिक परिवार आणि सतेज पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक पराभवाला महाडिक कुटुंबाला सामोरे जावे लागले. यावर्षी विधानपरिषदचेची ( kolhapur vidhanpaishad election ) निवडणूक होणार होती. त्यामुळे अनेक पराभवांचा महाडिक कुटुंब मोठ्या ताकदीने सामोरे जाईल असे दिसत होते. मात्र, राज्यासह वरिष्ठ पातळीवर अशा काही हालचाली झाल्या त्यानंतर राज्यातील काही जागांवरील निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये महाडिक परिवारील अमल महाडिक सतेज पाटील यांच्या विरोधात उभे होते. मात्र, त्यांनी सुद्धा पक्ष आदेश पाळून स्वतःची उमेदवारी मागे घेत ही निवडणुक बिनविरोध झाली. त्यामुळे दुसऱ्यांदा सतेज पाटील विधानपरिषदेवर निवडून आले.
  4. कोरोनानंतर कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र तसेच धार्मिक स्थळं पुन्हा सुरू : दरम्यान कोरोनामुळे सर्वकाही पुन्हा ठप्प झाले होते. अनेक व्यवसाय, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत गेला. त्यानंतर कला तसेच क्रिडा क्षेत्र सुद्धा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. कोल्हापूरातील कुस्तीचे आखाडेही सुरू झाले. तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा नाट्यगृह तसेच चित्रपटगृह सुरू झाली. त्यामुळे येथील केशवराव भोसले नाट्यगृहात अनेक कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यात चित्रपटांसह मालिकांच्या चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह येथील अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरम्यान, कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची भारताच्या 23 वर्षावरील फुटबॉल टीममध्ये निवड झाली. ही सुद्धा क्रीडा क्षेत्रातील आनंदाची बातमी होती.
  5. दोन ठिकाणी झालेल्या खोदकामात सापडले तोफगोळे तसेच एक भले मोठे तळे : दरम्यान, अनेक ठिकाणी काहीही खोदकाम सुरू असताना नाणी किंव्हा जुन्या वस्तू सापडल्याचे पाहायला मिळते. मात्र कोल्हापूरात खोदकाम करताना चक्क एक भले मोठे तळे (Canon Found In Kolhapur ) सापडले. तसेच दिशादर्शक फकल लावण्यासाठी खड्डा काढत असताना तोफगोळे सापडल्याची घटना सुद्धा या वर्षांत घडली. कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यातील वाकरे गावात सोलर पॅनेल लावण्यासाठी काम सुरू होते यावेळी खोदकामात तळे सापडले. तर पन्हाळ्याच्या लगतच असणाऱ्या पावनगडावर दिशादर्शक फलक लावण्यासाठी काही दुर्ग मावळे 4 फेब्रुवारी रोजी खड्डा खोदत होते. तेंव्हा एक दोन नव्हे तर तब्बल 400 हुन अधिक तोफगोळे सापडले. केवळ छोटया खड्ड्यात एव्हड्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडले त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात त्या भागात तोफगोळे सापडण्याची शक्यता वर्तवली गेली. दरम्यान, पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती देऊन त्यांनी याबाबत पंचनामा करून सुरक्षेच्या कारणात्सव तो खड्डा बुजवला. दरम्यान, अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडामध्ये सुद्धा खोदकामावेळी पुरातन वस्तू सापडल्या. यामध्ये चालुस्थितीत असलेली बंदुकीसह अनेक दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे.
  6. आरोग्य क्षेत्रात मोठी कामगिरी : कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. त्यामुळे कोरोनावर जगभरात कोरोनावर औषध निर्माण करण्यासाठी कंपन्या काम करत होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून औषध निर्माण क्षेत्रात काम असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा येथील 'आयसेरा बायोलॉजीकल' या कंपनीने कोरोनावर 'अँटीकोव्हिड सीरम' नावाचे इंजेक्शन तयार केले असून रुग्णांना दोन इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो असा या कंपनीतील शास्त्रज्ञांनी दावा केला. स्वतः 'आयसेरा बायोलॉजीकल' चे संचालक दिलीप कुलकर्णी आणि नंदकुमार कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हे सांगितले. तसेच या इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो, याचा दावा सुद्धा कंपनीने केला. मात्र याला अनेक मान्यता घ्याव्या लागणार असल्याने ही प्रक्रिया सुरू आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला कोल्हापूरात 16 जानेवारीला सुरुवात झाली. दरम्यान, राज्यात कोरोनारुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. या समस्येवर उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात आला. संपूर्ण राज्यासाठी हा एक दिशादर्शक आणि अनुकरणीय असा प्रकल्प ठरला. शासनाने सुद्धा यासारखेच प्रकल्प राज्यभर उभे करण्याचा विचार करत अनेक प्रकल्प उभे केले.
  7. हनी ट्रॅप, तसेच अनैतिक संबंधामुळे हत्येच्या घटना : जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात सुद्धा अनेक घटना घडल्या. यामध्ये प्रमुख्याने हनी ट्रॅपच्या घटनेसह अनैतिक संबंधांमुळे हत्या झाल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात अनेकांना मुलींनी तसेच महिलांनी आपल्या जाळ्यात ओढत त्यानंतर संबंधितांना ब्लॅकमेल करत करोडो रुपये लुटल्याच्या घटना समोर आल्या. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी अनेक आशा प्रकारे फसवणूक किंव्हा ब्लॅकमेलिंग होत असेल तर पोलीसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे अनेक महिलांसह त्यांच्या साथीदारांना शोधून पोलिसांनी जेरबंद केले. याचबरोबर जिल्ह्यात अनैतिक संबंधांमुळे हत्या झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या. काही चिमुकल्यांचा या दुर्दैवी घटनांमुळे बळी गेला. शिवाय राजस्थानमधील कुख्यात गुन्हेगार पपला गुर्जरला कोल्हापुरातून अटक करण्यात आली. राजस्थान पोलिसांनी मोठ्या शिताफीने पपला गुर्जरला अटक केली या कारवाईमध्ये कोल्हापूर पोलिसांची सुद्धा मोठी मदत झाली आहे. विशेष म्हणजे ईआरटी कमांडोंच्या मदतीने ही कारवाई झाली होती. शिवाय, कोल्हापुरात सहायक नगररचना अधिकारी गणेश माने याला 20 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. आजपर्यंत कोल्हापूरातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
  8. महापालिकेची निवडणूक तिसऱ्यांदा पुढे ढकलली : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सुद्धा याच कारणाने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. मात्र तीन वेळा निवडणूक पुढे ढकलली. शिवाय आता त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अधिकच लक्ष लागले असून ही निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
  9. मेघोली धरण दुर्घटना : भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील धरण फुटल्याची ( Megholi Dam Incident ) घटना घडली. 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. हा प्रकल्प फुटल्याने अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन नवले गावातील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर काही जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला. सुदैवाने काहीजणांना बचावण्यात यश आले. दरम्यान, या फुटलेल्या तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. रात्री घटना घडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
  10. एसटी आंदोलनाने मोठा फटका : राज्यभर सुरू असलेल्या एसटी आंदोलनाचा कोल्हापूरातील नागरिकांना सुद्धा मोठा फटका बसला. अजूनही एसटी आंदोलन सुरू असून कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सर्वच स्थरातून मागणी होत आहे. एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला असून ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Last Updated : Dec 28, 2021, 9:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.