कोल्हापूर - भाजपचे आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या हातात सत्तासुंदरी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्याची अवस्था सैरभैर झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार-
शेट्टी म्हणाले, आत्मनिर्भर यात्रेच्या माध्यमातून कृषी कायदे कसे महत्वाचे आहेत? शेती क्षेत्राच्या दृष्टीने कसे हिताचे आहेत हे सांगण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन भाजपने केले होते. मात्र त्यांना हे पटवून सांगता आले नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
कृषी कायद्यामध्ये काही दम नाही-
कृषी कायद्यामध्ये काही दम नाही, हे शेतकऱ्यांनी ओळखलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातला शेतकरी या कायद्याच्या विरोधात उभा राहिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आत्मनिर्भर यात्रेचे नौटंकी भाजपने केली, असा टोला शेट्टी यांनी लगावला. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने हे सगळे सैरभैर झाले आहेत. ही यात्रा फसलेली असून या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे.
भाजप सरकारचे शेतकऱ्यांवरील प्रेम बाहेर पडत आहे. उत्तर प्रदेश सरकारने दोन म्हशी पेक्षा जास्त जनावर असल्यास त्यांना व्यावसायिक वीज बिल लादले जाईल, असा निर्णय घेतला आहे. तर दहा पेक्षा जास्त जनावर असल्यास प्रदूषण मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. तसेच पंजाब, हरियाणा मधील शेतकऱ्यांनी जर भाताचं पिंजार पेटवल तर एक कोटी रूपये दंड आहे, असा सरकारने कायदा केला आहे. महाराष्ट्रात शेतकरी उसाचा फड पेटवतात, तर एक कोटी दंड भरायचा का? असा सवाल शेट्टी यांनी केला.
भाजप सरकारला शेतकऱ्यांना उध्वस्त करायचा आहे आणि मुलामा मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा घ्यायचा आहे, असं देखील शेट्टी म्हणाले.
हेही वाचा- सी- लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 26 जानेवारीपासून 'फास्ट टॅग' बंधनकारक